लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या.ऑगस्टमध्ये ३ आणि ६ तारखेला दिल्लीहून ऑस्ट्रेलियाकरिता एअर इंडियाची विशेष उड्डाणे आहेत. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानात मर्यादित सिटचे बुकिंग करण्यात येत आहे. विमानात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून काही सिट रिक्त ठेवण्यात येत आहेत. या कारणामुळे प्रवाशांकडून ठराविक तिकिटाच्या भाड्याऐवजी जास्त आकारण्यात येत आहे. त्यामुळे तोटा भरून निघेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. विमानात क्षमतेनुसार बुकिंग करण्यात येत नसल्याने अनेक प्रवाशांना तिकीट मिळाले नाही. ट्रॅव्हल एजंटसुद्धा विदेशी उड्डाणांवर नजर ठेवून आहेत. स्थानिय एअर इंडियाच्या कार्यालयात ऑस्ट्रेलिया उड्डाणाच्या बुकिंगसाठी अनेक प्रवासी दुपारी २ वाजेपर्यंत येत होते. पण त्यांना निराश होऊन परतावे लागले.एअर इंडिया भविष्यात कॅनडाकरिता विशेष विमान सुरू करणार आहे. सध्या एअर इंडियाचे नागपुरातून दिल्लीला विमान उपलब्ध असल्याने नागपुरातूनच या देशाकरिता बुकिंगसाठी अनेकजण प्रयत्नरत आहे.
ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:31 PM
एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या.
ठळक मुद्देएअर इंडिया : प्रवासी निराश होऊन परतले