आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने भंडाफोड केला होता. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ३० एप्रिल २०१७ रोजी बुटीबोरी रोडवर डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना येथील उपकरण चोरीला गेले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या केंद्राचे उद्घाटन केले होते.१९ सप्टेंबर २०१७ च्या जवळपास अज्ञात इसमाने वर्धा मार्गावरील स्वयंचलित हवामान संचातील सौर ऊर्जा प्लेट, बॅटरी, लाईट हे साहित्य चोरून नेले होते. यासंदर्भात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. यातील आरोपीला अटक झाली नसली तरी तपास सुरू आहे. या स्वयंचलित हवामान संचात आवश्यक ती उपकरणे लावून त्याला परत सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट केले.
नागपुरातील स्वयंचलित हवामान संच अखेर सुरू; राज्य शासनाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 9:11 PM
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
ठळक मुद्दे‘लोकमत’ने केला होता भंडाफोड