शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:12 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली.राणी दुर्गावती चौक, कांजी हाऊस चौक, कमाल चौक, इंदोरा बौद्ध विहार, शिवशक्तीनगर, गरीब नवाजनगर, टिपू सुलतान चौक, भांडार मोहल्ला येथे प्रत्यक्ष जाऊन भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रास्त दरात जनतेला जीवनावश्यक वस्तू द्या, भाजी दुकानासमोर सामाजिक अंतर ठेवा, गर्दी होणार नाही, यासाठी चुन्याने खूण(मार्किंग) करण्याचा त्यांनी सल्ला दिला. बाजारातील नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले.तसेच खासगी किराणा व धान्य दुकानांमध्ये जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्याव्यात, भाववाढ, साठेबाजी आणि काळाबाजार करू नका, असे दुकान मालकांना सांगितले. आपात्कालीन परिस्थितीत जास्त दराने वस्तू विक्री करू नका, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारादेखील दिला. पालकमंत्र्यांनी विविध चौक, नगर, वस्त्यातील नागरिकांशी व्यक्तिश: संवाद साधला व शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा त्यांनी विश्वास दिला. याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्री