लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २८.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात सर्वाधिक १०१.२० मि.मी. तर कुरखेडा ६८.५०, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर ८७.०१, सेलू ७५ मि. मी., चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी ७६.३०, चिमूर ७३.२० तर नागभिड तालुक्यात ७२.४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ६७.२० मि. मी. पाऊस पडला आहे.विभागात सोमवारी सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे आहे. वर्धा ४०.८३ मि.मी. , गडचिरोली ३८.२० मि.मी., चंद्रपूर ३२.८८ मि.मी. , गोंदिया १५.९८ मि.मी., नागपूर २३.५० मि.मी. तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी २०.९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नागपूर विभागात १ जून २०१९ ते २६ आॅगस्ट २०१९ पर्यत सरासरी ८६०.०१ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
नागपूर विभागात सरासरी २८.७३ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 8:08 PM
नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २८.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात सर्वाधिक १०१.२० मि.मी.