शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अविनाश गावंडे नागपूर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:36 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा फायदा रुग्णसेवेला व रुग्णालयाच्या कार्यपद्धतीला गती देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची नोंद आहे. येथे विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यातून रोज शेकडो रुग्ण येतात. रुग्णसेवेपासून ते इतर प्रशासकीय जबाबदारीचा भार वैद्यकीय अधीक्षकांवर असतो. अधीक्षकपद एका वर्षासाठी असले तरी अनेक वरिष्ठ अधिकारी ही जबाबदारी घेण्यास टाळतात. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावाी २०१७ पासून या पदावर कार्यरत होते. डॉ. गोसावी यांच्याकडे औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी येताच त्यांनी अधीक्षकपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याचे पत्र दिले होते. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी ७ नोव्हेंबर रोजी डॉ. अविनाश गावंडे यांची वैद्यकीय अधीक्षक पदाच्या नियुक्तीचे पत्र काढले. डॉ. गावंडे यांच्यावर जेव्हा जेव्हा मेडिकल प्रशासनाने कामाची जबाबदारी टाकली तेव्हा तेव्हा त्यांनी ती यशस्वी पूर्ण केली. त्यांच्याकडे यापूर्वी अभिलेखागार विभाग, सामाजिक सेवा अधीक्षक विभाग, शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र व सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी होती. त्यांनी येथे आपल्या कामाची छाप पाडल्याने या विभागात बरीच सुधारणा झाली. त्यांना असलेल्या कार्याचा अनुभव लक्षात घेऊनच डॉ. मित्रा यांनी त्यांची वैद्यकीय अधीक्षक पदासाठी निवड केली. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गावंडे म्हणाले, मेडिकलमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला कसे तातडीने उपचार मिळतील याकडे लक्ष दिले जाईल. शिवाय, रुग्णालयाच्या कार्यपद्धतीत आणखी गती आणण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. रुग्णालयाच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय