शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायती निवडणुकीच्या प्रतिक्षेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 2:48 PM

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा २८ एप्रिल २०२१ ला संपला. त्यामध्ये भिवापूर तालुक्यातील गाडेघाट, कुही तालुक्यातील फेगड, गोन्हा, नवेगाव, सिर्सी, तरोळी, सावंगी व पुडका गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआठ ग्रामपंचायतीवरील प्रशासकाचाही कार्यकाळ संपला : स्थानिक गावकऱ्यांची मागणी

नागपूर : कोरोनाचे कारण सांगून जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सरकारने प्रलंबित ठेवल्या. या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसून त्यांचा कार्यकाळही आता संपला आहे. मागच्या महिन्यात पुन्हा ८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून कारभार प्रशासकाच्या हाती देण्यात आला आहे. दुसरीकडे निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे आता या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे.

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा २८ एप्रिल २०२१ ला संपला. त्यामध्ये भिवापूर तालुक्यातील गाडेघाट, कुही तालुक्यातील फेगड, गोन्हा, नवेगाव, सिर्सी, तरोळी, सावंगी व पुडका गावांचा समावेश आहे. ही गावे प्रकल्पबाधित असल्याने येथील जनसमस्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाने प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकाचा सहा महिन्याचा कार्यकाळही संपलेला आहे. येथील गावकऱ्यांनी निवडणुक घेण्यास काहीही हरकत नसल्याने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.

दुसरीकडे १६ सप्टेंबर २०२१ रोजी रामटेक व भिवापूर तालुक्यातील पुन्हा ८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला. तिथेही प्रशासकाच्या हाती कारभार सोपविला आहे. पुढीलवर्षीच्या जानेवारी महिन्यांत आणखी काही ग्रामपंचायतींचा कार्यकाळ समाप्त होणार आहे.

या सर्व ग्रामपंचायतीचा कार्यभार प्रशासकांकडे देण्यात आला आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी नसल्याने गावविकासाच्या दृष्टीने निर्णय होत नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली़ आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लावायला हवा होता. मात्र, कोरोनाचे कारण सांगत जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाला तशा आशयाचा अहवाल पाठविण्यात आला नाही. त्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत.

मनोज तितरमारे, माजी जि.प. सदस्य

आयोग डेडलाईन पाळणार का?

कुठल्याही निवडणुका या सहा महिन्यांच्या आत घ्याव्या लागतात. आठ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ हा एप्रिल महिन्यांतच पूर्ण झाला. प्रशासकाच्या हातात कारभार सोपवून सहा महिन्यांपेक्षा जास्त झाले. विशेष म्हणजे प्रशासकाच्या हातात सहा महिन्यापेक्षा जास्त काळ कामकाज सोपविता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने आपली डेडलाईन पाळावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक