लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांनी समाजामध्ये काँग्रेसच्या विचारधारा पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन काँग्रेस नेत्या अॅड. नंदा पराते यांनी केले.राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाल येथील शिक्षक सहकारी बँक सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी कुंदा राऊत, वृंदा ठाकरे, प्रज्ञा बडवाईक, राधाबाई पाठराबे प्रमुख अतिथी होत्या.अॅड. पराते म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात विद्वेष पसरविला जात आहे. सध्या देशात दहशतीचे वातावरण आहे. संविधानास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा अशा परिस्थितीत देशाला काँग्रेसच्या विचारधारेची गरज आहे. त्यामुळे जनमानसात काँग्रेस विचारधारा पोहोचविण्याचे कार्य महिलांनी करावे.याप्रसंगी अनिता हेडाऊ, मंजू पराते, शकुंतला वट्टीघरे, प्रभा देवघरे, शालू नंदनवार व कल्पना अड्याळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मेळाव्याचे संचालन गीता जळगावकर तर मंदा शेंडे यांनी आभार मानले. प्रमिला वाडीघरे, रेणुका मोहाडीकर, पुष्पा शेटे, आशा चांदेकर, कमल पराते, सुषमा पौनीकर, रुपाली मोहाडीकर, कल्पना मोहपेकर, इंदिरा खापेकर, माया धार्मिक, अलका दलाल, ललिता पौनीकर, लता सुभेदार, शारदा खवास, संगीता सोनक, कुंदा निनावे, शेवंता कोहाड आदी उपस्थित होत्या.
कॉँग्रेसच्या विचारधारेची जागृती करा : नंदा पराते यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:03 PM
महिलांनी समाजामध्ये काँग्रेसच्या विचारधारा पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन काँग्रेस नेत्या अॅड. नंदा पराते यांनी केले.
ठळक मुद्देमहिला मेळावा