शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:50 AM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देउल्लेखनीय कामगिरीसाठी समग्र दक्षता शिल्डने सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी मुख्यालयातील आणि विभागातील २० अधिकारी १४१ कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. याशिवाय सुनील सिंह सोईन यांच्यातर्फे आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी वाणिज्य, कार्मिक, सिग्नल अ‍ॅन्ड दुरसंचार, यांत्रिक, विद्युत, आरोग्य, सुरक्षा, भंडार, लेखा, राजभाषा आदी विभागांना शिल्ड प्रदान केले. विभागाला बांधकामाच्या क्षेत्रात दक्षता शिल्ड देण्यात आले. या सर्व शिल्ड महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांच्या हस्ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भारतीय रेल्वेत सर्वाधिक जास्त उत्पन्न करणारे झोन असून झोनने यादृष्टीने चांगले प्रदर्शन करून २०१८-१९ मध्ये एक रेकॉर्ड कायम केला आहे. नागपूर विभागाने उल्लेखनीय कामगिरी बजावून समग्र दक्षता शिल्ड मिळवून सर्व विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी याचे श्रेय विभागातील रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहे. विभााग रेल्वेगाड्यांचे चांगले संचालन आणि प्रवाशांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर