लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’वर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला आहे. परंतु तरीदेखील अनेक नागरिक, तरुण विनाकारण घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. ‘लॉकडाऊन’दरम्यान घरातच थांबणे किती आवश्यक आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ‘सेव्ह लाईफ चेन’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता दररोज पाच नागरिकांना फोन करून घराबाहेर न पडण्याची विनंती करत आहे. संपूर्ण विदर्भात ही मोहीम राबविण्यात येत आहे.‘कोरोना’चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरिकांनी एकमेकांपासून अंतर राखणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरावरून आवाहन केले जात आहे. ‘अभाविप’नेदेखील यात पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी 'लॉकडाऊन'दरम्यान घरीच राहावे, असे आवाहन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 'सेव्ह लाइफ चेन' अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत अभाविपचा प्रत्येक कार्यकर्ता पाच नागरिकांना फोन करून घराबाहेर न पडण्याची विनंती करीत आहे. नागरिकांनी ही फोन साखळी पुढे सुरू ठेवावी, असे आवाहन अभाविपने केले आहे. पाच घरांशी संपर्काची ही साखळी सुरू राहिल्यास अधिक घरांपर्यंत 'सोशल डिस्टन्सिंग'चा संदेश पोहोचणार आहे. त्यातून ‘कोरोना’वर नियंत्रण आणणे शक्य होईल, असा विश्वास ‘अभाविप’तर्फे व्यक्त करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हेल्पलाईन’‘कोरोना’मुळे बाहेरगावचे अनेक विद्यार्थी वसतिगृहे किंवा त्यांच्या खोल्यांमध्येच आहेत. त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी ‘अभाविप’ने विशेष ‘हेल्पलाईन’ सुरू केली आहे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारीदेखील दिली आहे. अभिषेक केसरी-शुभम देशपांडे (दक्षिण-पश्चिम नागपूर), शंतनू झाडे-संकेत जवळकर (दक्षिण नागपूर), अक्षय आष्टनकर-सौरभ गोडे (पूर्व नागपूर), अंकुश हेमने-अबुजार हुसेन (मध्य नागपूर), प्रशांत सिंह-भूषण भडांगे (पश्चिम नागपूर), प्रतिक लिंगायत-नितीन पारीडकर (उत्तर नागपूर) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Corona Virus in Nagpur; ‘लॉकडाऊन’संदर्भात नागपुरात ‘अभाविप’तर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:37 AM