रामटेक : जिल्हा प्रशासनाने काेराेना संक्रमणासाेबत म्युकरमायकाेसिस या आजाराबाबत ग्रामीण भागात जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रामटेक तालुक्यातील शीतलवाडी-परसाेडा येथील ग्रामसंवाद भवनात शनिवारी (दि. २९) जनजागृती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात नागरिकांना म्युकरमायकोसिस या आजाराविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी हेमा बढे, तहसीलदार बाळासाहेब मस्के, खंडविकास अधिकारी मते, सरपंच मदन सावरकर, ग्रामविकास अधिकारी के. एच. गायकवाड, तलाठी चंदन बावणे, जांभुळे उपस्थित हाेते. या अधिकाऱ्यांना काेराेना व म्युकरमायकाेसिस या आजाराची लागण कशी हाेते, त्याची लक्षणे, उपचार पद्धती, त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी, यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासह काही नागरिक उपस्थित हाेते.