शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

नाही व्हायचे आयुर्वेदिक डॉक्टर

By admin | Published: October 29, 2015 3:10 AM

आयुर्वेदिक आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा खाली असणे ही सामान्य बाब आहे.

१०० पैकी ९९ जागा रिक्त : डीएमईआरने जारी केले प्रवेशासाठी नोटिफिकेशनमुस्तफा मुनीर नागपूरआयुर्वेदिक आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या जागा खाली असणे ही सामान्य बाब आहे. परंतु १०० पैकी ९९ जागा रिक्त असतील आणि केवळ एकच विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असेल तर आश्चर्यकारक घटना नक्कीच आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्यानुसार नागपुरातील शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमधील १०० पैकी ९९ जागा रिक्त आहेत. आतापर्यंत केवळ एकाच विद्यार्थ्याने बीएएमएस अभ्यासक्रमासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. डीएमईआरने यासंदर्भात आपल्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जारी केले असून या जागांवरील प्रवेशासाठी २८ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरूकरण्याचे आदेश बजावले आहेत. यासंदर्भात आयुर्वेदिक कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्केवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा लोकमतने प्रयत्न केला, परंतु कुणीच फोन उचलला नाही. कार्यालयाच्या दूरध्वनीवरसुद्धा कुठलेही उत्तर मिळाले नाही. मेडिकलमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसला वगळले तर सर्व अभ्यासक्रमाची परिस्थिती दयनीय आहे. खासगी महाविद्यालये तर दूरच राहिलीच शासकीय महाविद्यालयांनासुद्धा विद्यार्थी मिळत नाहीत. डीएमईआरच्या नोटिफिकेशननुसार राज्यातील २० आयुर्वेदिक महाविद्यालयात शासकीय कोट्यातील ११२० जागांपैकी ६२० जागा रिक्त आहेत. त्याचप्रकारे बीयुएमएसच्या तीन कॉलेजमधील शासकीय कोट्यातील ७५ पैकी ३२ जागा रिक्त आहेत. बीपीटीएचच्या पाच कॉलेजमधील शासकीय कोट्यातील ९० पैकी २९ जागा रिक्त आहेत. बीओटीएच अभ्यासक्रमाच्या चार कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातील ९० जागा आहेत. त्यापैकी ५९ जागा रिक्त आहेत. बीएएसएलपीचे राज्यात दोनच कॉलेज आहेत. यात शासकीय कोट्यातील २५ पैकी १८ जागा रिक्त आहेत. त्याचप्रकारे बीएससी नर्सिंगचे राज्यात चार कॉलेज आहेत. यात शासकीय कोट्यातील २०० पैकी १०७ जागा रिक्त आहेत. नागपुरात शासकीय कोट्यातील रिक्त जागा डीएमईआरच्या नोटिफिकेशननुसार नागपुरातील दोन आयुर्वेदिक कॉलेजमधील जीएमसी आणि एसएसीमध्ये शासकीय कोट्यातील १७० पैकी १३४ जागा रिक्त आहेत. जीएमसी नागपूरमध्ये बीपीटीएचच्या ३० पैकी १३ जागा, बीओटीएचच्या ३० पैकी २३ जागा, आणि बीएससी नर्सिंगच्या ५० पैकी २३ जागा रिक्त आहेत.