शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

कोरोनावर आयुर्वेदिक उपचार प्रभावी, केवळ विश्वास महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:08 AM

- औषधांच्या तुटवड्यापोटी भटकंती थांबवा : तीन ते दहा दिवसांत रुग्ण होतोय ठणठणीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक ...

- औषधांच्या तुटवड्यापोटी भटकंती थांबवा : तीन ते दहा दिवसांत रुग्ण होतोय ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेक आजार हे संक्रमणावस्थेतील आहेत. त्यांचा प्रभाव कमी- जास्त असतो. आजार म्हणजे नेमके काय, हा प्रश्न जेव्हा जगताला पडायला लागला, तेव्हा त्यावरील संपूर्ण उपचाराची विधी भारतात आयुर्वेदाच्या रूपाने विकसित झाली होती. याचे अनेक प्रभावी दाखले शास्त्रांमध्ये आढळून येतात. मात्र, देशाबाहेरील कोणत्याही विधीचा विषय येतो, तेव्हा आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो, ही परंपरा आपली झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या बाबतीतही अशाच स्थितीचा सामना आपण करतो आहोत. कोरोनासारख्या अनन्यसाधारण संक्रमणाविरोधात आयुर्वेदात प्रभावी उपचार हजारो सालापासून अस्तित्वात आहेत. एवढेच नव्हे तर व्यक्तिश: अंतर, मुखाच्छादन (मास्क)चे महत्त्व आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीची औषधरूपी व्यंजने आयुर्वेदात स्पष्टपणे सांगितली गेली आहेत. सध्या, कोरोना उपचारात हॉस्पिटल्स, संसाधने, स्टाफची संख्या कमी पडते आहे, औषधांचा तुटवडा प्रचंड निर्माण झाला आहे, अशा चर्चा उडत आहेत. तुटवड्यामुळे तर औषधांचा काळाबाजारही फोफावल्याचे दिसून येते. ही सगळी समस्या आपण स्वत:हून निर्माण केलेली आहे. मुळात आपल्याकडे उपचाराच्या अनेक सुविधा उपलब्ध असताना औषधांचा तुटवडा निर्माण होतोच कसा, हा प्रश्न आहे. उपचारात प्रत्येक पॅथी महत्त्वाची आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्या प्रभावीही आहेत. आयुर्वेदात तर प्रकृतीनुसार औषधांच्या मात्रा दिल्या जातात. कोरोनासारख्या गंभीर आजारात रुग्ण आयुर्वेदिक औषधांच्या मात्रेने तीन ते दहा दिवसांत बरा झाल्याची अनेक उदाहरणे असल्याचे प्रसिद्ध आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. नितेश खोंडे यांनी सांगितली.

आयुर्वेदाने कोरोना रुग्ण बरा होतो, हा तुमचा दावा आहे?

- हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशी स्पष्टता असते, तेव्हा दावा करण्याची गरज नाही. सगळेच डोळ्यापुढे असते. केवळ विश्वास ठेवण्याची गरज आहे. कुठल्याही रोगाविरोधात लढण्यासाठी तुमची इम्युनिटी पॉवर सगळ्यात महत्त्वाची असते. इम्युनिटी उत्तम असेल तर तुमचा लढा आणि रोगाविरुद्ध जिंकण्याची टक्केवारी वाढत असते. मी तर अनेकांना ॲलोपॅथीचे उपचार सुरू असतानाही माझ्याकडील कोरोनाबाबत तयार केलेली किट देण्यास सांगितले होते. ज्यांनी अशा प्रकारे संयुक्त उपचारास परवानगी दिली, ते रुग्ण आज अत्यवस्थतेतून उत्तमावस्थेत आल्याचे दिसत आहेत.

कोरोनावरील आयुर्वेदिक औषधे महाग आहेत?

- कोरोनावरील जी औषधे सद्य:स्थितीत वापरात आहेत, त्यांच्या किमती बघता आयुर्वेदिक औषधे निश्चितच अल्प किमतीत उपलब्ध होत आहेत. मी कोरोनावरील औषधे तीन-साडेतीन हजारात रुग्णांना देत आहे. औषधांची ही मात्रा पूर्ण घेतल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच. सोबतच कफ, खोकला, सर्दी, ताप हेसुद्धा नष्ट होतात. आज प्रत्येक कोरोना रुग्ण १० ते २० हजारांच्या औषधी घेत आहेत. अशा स्थितीत आयुर्वेदिक औषधे तुमच्या खिशाला आणि आरोग्याला परवडणारीच आहेत.

यावर आयुर्वेदिक उपचार कोणते?

- आयुर्वेदात पूर्व संक्रमण आणि उत्तर संक्रमणावर अनेक प्रभावी उपचार आहेत. कोणत्याही आयुर्वेदिक औषधालयात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. त्यात पद्मपत्रा सूक्ष्म वटी दर दिवशी दोन गोळ्या चार ते सहा वेळा घेतल्याने कफ वेगाने सोखण्याची क्रिया होते. ही वटी पाणी पातळ करते आणि बाहेर काढण्यास कारक आहे. ज्वर असेल तर महासुदर्शन काढा किंवा त्रिभुवन कीर्ती वटी किंवा गिलोय संशमणी वटी घ्यावी. यामुळे ताप दूर होतो. शिवाय, प्रवाळ गोदंती व गिलोय सत्त्व घेतल्यास ताप कमी होण्यास मदत होते. सोबतच सिद्धपरी कॅप्सूल किंवा सिरप घ्यावा. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, याकाळात सर्वांनी भीमसेनी कापूर घरात बाळगावा आणि सतत या कापराचा वाफारा घ्यावा. आम्ही या व अशा काही औषधांची एक कोरोना किट तयार केली आहे. यात काढा, अणूतेल व धूम हे अतिशय महत्त्वाचे आहेत.

कोरोनावर स्वतंत्र आयुर्वेदिक उपचार करता येतात का?

- नक्कीच. परंतु सध्या सर्वत्र ॲलोपॅथिक उपचारांवरच भर दिला जात आहे. रुग्णांची वाढती संख्या, हॉस्पिटल्स व बेड्ची उणीव आणि औषधांचा निर्माण झालेला तुटवडा बघता शासनाने सर्वच पॅथींना उपचाराची परवानगी देणे गरजेचे आहे. एकाच पॅथीवर भार निर्माण झाला की, त्याचे पर्यवसान गैरव्यवहाराकडे होते. याचा अनुभव औषधांच्या काळ्या बाजारावरून आपण घेतच आहोत. आयुर्वेदाला थेट कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली गेली, तर प्रशासनावरील भार तर कमी होईलच. शिवाय, रुग्ण बरे होण्याचा वेग वाढेल आणि कोरोनामुक्त भारताकडे वाटचाल वेगाने होईल.

---------------------

आयुर्वेदिक उपचाराबाबत समाधानी रुग्ण

संयुक्त उपचार प्रभावी ठरले

माझा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो कोरोनाबाधित झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. वर्तमान स्थिती बघता मनात अनेक शंका-कुशंका होत्या. तेवढ्यात ‘लोकमत’मध्ये डॉ. नितेश खोंडे यांचा कोरोना उपचारावरील लेख वाचला. तात्काळ पारिजात हॉस्पिटल गाठले आणि कोरोना किट घेतली. हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथी आणि खोंडे यांची आयुर्वेदिक किट, असे दोन्ही उपचार सुरू ठेवले. तीन दिवसांत गुण आला आणि मुलाला सुटी मिळाली. आता तो ठणठणीत आहे.

- प्रभाकर निखारे, सर्वश्रीनगर, दीघोरी ()

पाच दिवसांत व्यवस्थित झालो

खोकला, सर्दी, ताप, जिभेची चव गेलेली, नाकाला कसला वास नव्हता. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आलेली होतीच. बाहेरची स्थिती बघता घरीच औषधोपचार सुरू झाले होते. दरम्यान डॉ. नितेश खोंडे यांची कोरोना किट घेतली. पाच दिवसांत खोकला गेला, सर्दी संपली, चव आणि वास परत आले. विशेष म्हणजे, भूक प्रचंड लागायला लागली. आता मी सुदृढ आहे.

- सूरज भोजापुरे, निष्टी, पवनी

.....................