नागपूर : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरमध्ये अॅड्यूडिकेशन व जस्टिंगमध्ये बीए एलएलबी ऑनर्सच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ झाला. विद्यापीठाने दाखल केलेल्या पहिल्या बॅचमध्ये दहा राज्यातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. न्यायपालिकेच्या प्रवेश स्तरासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे. हा अभ्यासक्रम पाचव्या वर्षी सुरू करून विद्यापीठाचे कुलपती आणि भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांचे स्वप्न साकार केले आहे. बोबडे यांनी अभिमुखता उद्घाटनात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा व्हिडिओ संदेश पाठविला आहे. न्याय शिक्षणात कोर्स सुरू करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. हा कोर्स कोठेही कुठल्याही प्रकारच्या खटल्यांचा निर्णय घेण्यास तयार असणाऱ्या अत्यंत उत्तम क्षमता असलेल्या न्यायालयीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कोर्टाद्वारे सुनावणी घेतलेल्या वास्तविक खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल, यावर त्यांनी भर दिला. याकरिता विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचे कृतज्ञ आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समितीने या कोर्सच्या यशस्वी प्रक्रियेसाठी सतत मार्गदर्शन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण मुंबई ओरिएन्टेशन प्रोग्रामचे प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार यांनी स्वागत भाषण केले. प्रा. सी. रमेश कुमार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष दीक्षित यांनी आभार मानले. (वा.प्र.)
एमएनएलयू नागपूरमध्ये बीए एलएलबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:26 AM