शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

बाबा एकदा डोळे उघडा...म्हणत मुलाने फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:54 PM

मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात येताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. ‘बाबा एकदा डोळे उघडा...’ असे म्हणून वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. ही दु:खद घटना समरसता एक्स्प्रेसमध्ये सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

ठळक मुद्देप्रवासात वडिलांचा मृत्यू : समरसता एक्स्प्रेसमधील प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात येताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. ‘बाबा एकदा डोळे उघडा...’ असे म्हणून वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. ही दु:खद घटना समरसता एक्स्प्रेसमध्ये सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.मधुसूदन पाल (६६) रा. नडिया, हावडा असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते आजारी होते. उपचारासाठी पत्नी आणि मुलासोबत ते मुंबईला गेले होते. उपचार घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. मुंबई-हावडा समरसता एक्स्प्रेसच्या एस-३, बर्थ, २०, २२ वरून ते कुटुंबासह प्रवास करीत होते. सकाळ होऊनही ते बर्थवरून उठले नाहीत. नागपूर रेल्वेस्थानक येत असल्यामुळे बहुतांश प्रवासी बर्थवरून उठलेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा भूपेशने आपल्या वडिलांना झोपेतून जागे होण्यासाठी आवाज दिला. त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भूपेशने वडिलांना हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा ते बर्थवरच निपचित पडले होते. ते कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून मुलगा भूपेश आणि त्याच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर गाडी थांबताच उपस्टेशन व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार रेल्वेचे डॉक्टर समरसता एक्स्प्रेसवर हजर झाले. त्यांनी मधुसूदन पाल यांना तपासून मृत घोषित केले. हे ऐकताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. बाबा एकदा उठा...डोळे उघडा असे म्हणून त्याने वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. ड्युटीवर उपस्थित हेड कॉन्स्टेबल अनिल कुवर यांनी मृतदेह गाडीखाली उतरवून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDeathमृत्यू