शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 3:15 PM

Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे.  आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आरक्षणावरुन बबनराव तायवाडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका ही समाजाची मागणी आहे, असंही तायवाडे म्हणाले. 

शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

"महाज्योतीला लोकसंख्येनुसार जास्तीत जात निधी द्यायला पाहिजे,युवक आणि सामान्य माणसाचे भले होईल. ओबीसी हॉस्टेल सुरू झाले नाही याचीही चर्चा व्हायला पाहिजे,बिहारमध्ये जशी जनगणना झाली तशीच जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून जातनिहाय जनगणना करण्यासाठी बाध्य करावे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

जरांगे पाटलांवर टीका

"मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेत्यांवर बोलत आहेत. जरांगे खालच्या स्तरावर भाषा वापरतात. त्यांची उंची आहे का?, असा सवालही बबनराव तायवाडे यांनी केला. ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात,येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते हे आम्ही दाखवून देऊ. पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आता आमची शक्ती दाखवू, असंही तायवाडे म्हणाले. 

कुणबी नोंदीबाबत बोलताना तायवाडे म्हणाले, ५४ लाख किंवा ५७ लाखांचा आकडा सांगत आहेत, यात ५७ लाखात ९५ टक्के नोंदी जरांगे पाटील यांच्या आंदोलन आधीच्या आहेत. सरकारने श्वेत पत्र जाहीर करावे, की जरांगे यांच्या आंदोलनपूर्वी आणि आंदोलन नंतर किती नोंदी झाली,मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे, असंही बबनराव तायवाडे म्हणाले. 

आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले , या ट्विटवर बोलताना तायवाडे म्हणाले, महाराष्ट्राला माहीत आहे की ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आम्ही आंदोलने करीत असतो. आमचे सर्व प्रश्न संविधानिक आणि शांततेत पूर्ण केले, आमच्या संघटनेने ४८ जीआर काढले आहेत. सरकारसोबत चर्चा करतो, मुद्दे मांडतो,अमच्याबाबतही कोणी बोलावे, ट्विट करावे, असंही तायवाडे म्हणाले.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण