शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

बबलू चौधरी यांना डच संशोधन संस्थेचा पुरस्कार, उंचावला नागपूरचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:10 PM

कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अ‍ॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन करणाऱ्या बबलू यांना त्यांनी कृषी मार्केटिंगसाठी सादर केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह व्हॅल्यू चेन मॉडेल’साठी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांनी नागपूरचा बहुमान जगभरात उंचावला आहे.

ठळक मुद्देशंभरावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये सहभाग

आॅनलाईन लोकमतनागपूर : कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अ‍ॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन करणाऱ्या बबलू यांना त्यांनी कृषी मार्केटिंगसाठी सादर केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह व्हॅल्यू चेन मॉडेल’साठी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांनी नागपूरचा बहुमान जगभरात उंचावला आहे.एवढ्याशा वयात शंभरावर राष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये मार्गदर्शन आणि १० आंतरराष्ट्रीय परिषदांमधून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बबलू यांना नाशिकच्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रतिष्ठेचा कृषी माऊली पुरस्कार जाहीर झाला असून येत्या २८ जानेवारी रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. पोलीसबॉय बबलू याने अकोल्याहून कृषी पदवी मिळविली. पुढे नेदरलॅन्डकडून पहिल्या वर्षी हार्टीकल्चर मॅनेजमेंट आणि दुसऱ्या वर्षी हार्टीकल्चर चेन मॅनेजमेंट विषयासाठी फेलोशिप प्राप्त करून आपली मास्टर्स डिग्री पूर्ण केली. या काळात संत्र्याच्या चेन मॅनेजमेंटसह अरेबिया आणि अमेरिकेच्या फळांवर रिसर्च पेपरसह रिसर्च प्रोजेक्टही सादर केले. कृषिमालाचे हार्वेस्टिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग, जागतिक बाजारपेठेत हवी असेलेली गुणवत्ता आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांचे मार्गदर्शन डचच्या संशोधकांनाही आकर्षित करीत आहे. विशेष म्हणजे फेलोशिपनंतर डच संस्थेने बबलू यांना मार्गदर्शक म्हणून पाचारण केले आहे. फेलोशिपसाठी जगभरातून निवड झालेल्या संशोधकांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. नुकतेच यावर्षी निवडलेल्या विविध देशांमधील ३० निवडक संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केले. नेदरलॅन्ड हा स्वत: जगात कृषिमाल निर्यात करणारा क्रमांक एकचा देश आहे. त्यामुळे अशा देशात नागपुरी तरुणाने इतर संशोधकांना मार्गदर्शन करणे एक मोठी कामगिरी आहे. डच संशोधकांच्या संस्थेनेही त्यांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य महत्त्वाचे मानून त्यांना हा पुरस्कार प्रदान केला हे विशेष. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा फॉर्म्युलाभारत हा कृषिप्रधान देश असूनही येथील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. याचे कारण जागतिक मार्केटिंगमध्ये आपण कमी पडतो. शिवाय शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेली रिटेलर, होलसेलर्स, ट्रेडर्स आणि सीएची मधली फळी सर्व नफा गिळंकृत करते. यासाठी ‘फार्मर प्रोड्युसर आॅर्गनायझेशन’ ही संकल्पना महत्त्वाची ठरू शकते. शेतकऱ्यांनी १००-२०० शेतकऱ्यांचा समूह तयार करून थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.एकटा शेतकरी मधल्या दलालांच्या फळीशी लढू शकत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या समूहाला हे काम सोपे होईल. त्यानुसार ग्रेडिंग, पॅकेजिंगच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहचता येते. जागतिक बाजारपेठेत पोहचण्याचा रस्ता यातून निघू शकतो असा विश्वासही बबलू चौधरी यांनी व्यक्त केला.जैविक शेती व जागतिक बाजारपेठजागतिक बाजारपेठेत कृषिमालाच्या मार्केटिंगसोबत गुणवत्तेलाही महत्त्व आहे. यामुळेच नागपूरच्या संत्र्याला मागणी नाही. भारतातील शेती रासायनिक खतांवर अवलंबून आहे. प्रगत देशांमध्ये रासायनिक खतांचा वापर करून केलेला माल स्वीकारला जात नाही. विशेष म्हणजे नेदरलॅन्डमध्ये जैविक शेतीलाच प्राधान्य दिले जात असून रासायनिक शेतीवर पूर्णपणे बंदी आहे. तेथील शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत नाही आणि तसे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. त्यामुळेच जगात नेदरलॅन्डच्या कृषिमालाला सर्वाधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. ही गुणवत्ता तपासूनच कृषिमालाचा स्वीकार केला जातो. भारतात यासाठी शासकीय यंत्रणांनी पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर