ठळक मुद्देजवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती साजरीशेकडो रक्तदात्यांचे रक्तदान : युवकांसोबतच, ज्येष्ठ नागरिक, महिलांचाही सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले.‘लोकमत भवनात’ आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार यादवराव देवगडे, ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर’चे संचालक डॉ. हरीश वरभे यांच्यासह ‘लोकमत’च्या विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात तरुणांसोबतच, प्रौढ विशेषत: महिलांही सहभागी झाल्या होत्या. लोकमतचे वाचक, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या दात्यांनी रक्तदान केले. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ६ वाजतापर्यंत रक्तदात्यांनी गर्दी केली होती.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, रघुवीर देवगडे, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, लोकमतचे फायनान्स कंट्रोलर मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष संजय खरे, महाव्यवस्थापक (इम्प्लिमेन्टेशन आॅफिस) आशिष जैन, महाव्यवस्थापक (वितरण) संतोष चिपडा यांच्यासह ‘लोकमत’च्या विविध विभागातील प्रमुख व लोकमत परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते. संचालन नेहा जोशी यांनी केले. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.शिबिराच्या आयोजनासाठी लोकमत इव्हेंट मॅनेजर आतिश वानखेडे, अश्विन पतरंगे, ‘लाईफ लाईन’ रक्तपेढीचे प्रवीण साठवणे, डॉ. अविनाश बाभरे, रवी गजभिये, देवयानी सेलुकर, जुही झोडापे, अमृता शाहू, अश्विनी खेकरे, पूजा वंजारी, आयेशा सिद्धीका, अर्शीया अख्तर, सिद्धार्थ गजभिये, मृणाल वाघ, रुपेश पंधराम व नरेश टोंपे आदींनी सहकार्य केले.