लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले राज्यमंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी सकाळी नागपुरात पोलिसांनी गेस्टहाऊसमध्येच रोखून धरले. त्यांना सकाळी ९ विमानाने मुंबईला जायचे होते. आज मुंबईत रिलायन्सच्या समोर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात ते सहभागी होणार होते. ते थांबलेल्या एरिगेशन डिपार्टमेंट गेस्टहाऊससमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रसिद्धीमाध्यमांना बाहेरच रोखण्यात आले आहे.