शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागपुरात जराशा पावसाने रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:45 AM

पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल.सध्या अनेक रस्त्यावर गिट्टी, माती आणि धूळ जमली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकातर्फे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोहीम चालविली जाते. मात्र यावेळी कोविड १९ च्या प्रकोपामुळे तीन महिने टाळेबंदी लागल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही. दरवर्षी हॉटमिक्स विभागाला गिट्टी, डांबर टाकण्यासाठी चार ते पाच कोटी रुपये मंजूर केले जातात. मागील स्थायी समितीने डांबर व गिट्टी खरेदीला मंजुरी दिली होती. मात्र महापालिकेच्या वाईट आर्थिक स्थितीमुळे दुरुस्तीची कामे रखडली आहेत. दुसरीकडे शहरातील प्रस्तावित सिमेंट रस्ते, विजेच्या तारा अंडरग्राऊंड करणे आदी कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. मेट्रो कॉरिडॉर, उड्डाणपूल आदी कामे ज्या भागात होत आहेत त्या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर