शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आईच्या मारहाणीचा सूड उगविण्यासाठी केला बादलचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 AM

बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कुख्यात बादलला संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देनातेवाईकानेच केली गुंडाची हत्या : पाचही आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कुख्यात बादलला संपविल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकारांना दिली. यावेळी इमामवाड्याचे ठाणेदार मुकुंद साळुंके हजर होते. 

नीलेश विनोद मेश्राम (वय २२), सन्नी भाऊराव बागडे (वय २३), उद्देश शालिक मेश्राम (वय २३), आदर्श ऊर्फ अ‍ॅक्शन अशोक जारोडे (वय २०) आणि रितिक ऊर्फ काल्या विक्की खोब्रागडे (वय १९), अशी सर्व आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण रामबाग, इमामवाडा परिसरात राहतात. नीलेश या हत्याकांडाचा सूत्रधार असून, तो बादलचा भाऊ आकाश (वय २६) याचा साळा आहे. आकाशने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे बादल चिडून होता. बादलच्या पत्नीला पाच महिन्यांचे बाळ आहे. उन्हाचे दिवस असूनही तो कधी कूलर बंद करायचा तर कधी पाणी बंद करून वहिनीला त्रास देत होता. बहीण ही बाब नीलेशला सांगायची. नीलेशने बादलला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला मारहाण केली होती. दुसरे म्हणजे, १० एप्रिलला नीलेशच्या आईने बादलला समजाविण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या नवबाळंतीण वहिनीला त्रास देऊन काय मिळवतो, अशी त्याला विचारणा केली असता बादलने नीलेशच्या आईलाही मारहाण केली होती. त्या दिवशीच नीलेशने बादलची हत्या करण्याचे पक्के केले होते. बाजूला राहणारा नीलेशचा खास मित्र सन्नी यालाही बादल मारायचा, त्रास द्यायचा. त्यामुळे सन्नीही बादलचा हिशेब चुकविण्याच्या मानसिकतेत होता. नीलेश आणि सन्नीने उद्देश तसेच आदर्शला आपल्या कटात सहभागी करून घेतले होते. नीलेशने तळेगावमधून एक तलवारही विकत आणली होती. ते संधीची वाट बघत होते. बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास बादल त्याचा मित्र सनी मलखनसोबत बैद्यनाथ चौकात चहाटपरीवर गेले होते. त्याच्या मागावर असलेला नीलेश आणि सन्नीने लगेच त्यांना पाहून घराकडे धाव घेतली. घरून तलवार तसेच अन्य शस्त्र, मिरची पावडर आणि उद्देश तसेच आदर्शला सोबत घेतले. हे चौघे बैद्यनाथ चौक, कामगार भवनच्या मागे सिमेंट रोडवर आले असता त्यांना आरोपी रितिक दिसला. त्यांनी त्याला बादलबद्दल विचारले असता त्याने बादल अजंता हॉलकडे गेल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व आरोपी  बाजूला उभ्या असलेल्या एका ऑटोत बसून बादलची वाट बघू लागले. जसा बादल आणि सन्नी त्यांना दिसला त्याचक्षणी त्यांनी बादलवर झडप घालून त्याला कोणतीही संधी न देता त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. त्यानंतर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. एवढेच नव्हे तर आरोपी सन्नी आणि रितिकने बादलला दगडानेही ठेचले. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले.  पोलिसांची भागमभाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. ऑक्टोबर २०१५ मध्ये बादलचे वडील राजू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने चुनाभट्टी बाजारात २०१६ मध्ये सौरभ अलोणी याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बदला म्हणून बादलची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तोच धागा धरून इमामवाडा पोलीस इकडेतिकडे धावपळ करीत होते. मात्र, बादलचा गेम प्रतिस्पर्धी टोळीने नव्हे तर त्याच्या नात्यातीलच आरोपीने केल्याची माहिती कळाल्याने अखेर गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी नीलेशसह पाचही आरोपींना अटक केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक