लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधीच अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आणखी भर घालत प्रवाशांच्या बॅग ‘सॅनिटाइझ’ करण्याची मशिनही रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार केला आहे. करारानुसार प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर एक मशीन लावण्यात आली आहे. त्यात बॅग टाकल्यानंतर लगेच ती ‘सॅनिटाइझ’ होऊन बाहेर येणार आहे. दिल्ली, अहमदाबाद नंतर पहिल्यांदा ही सुविधा नागपुरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधैनुसार रेल्वेला वार्षिक ५ लाख ५२ हजाराचा महसूल मिळणार आहे. यावेळी नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थाप विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.
मशीनमध्ये टाकताच होईल बॅग ‘सॅनिटाइझ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:36 PM