शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नागपुरातील महाठग बघेलच्या ठगबाजीचे जाळे देशभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:40 PM

देशभरात ठगवाजीचे नेटवर्क विस्तारून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा महाठग पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल सध्या नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक) कस्टडीत आहे. त्याने देशभरातील नागरिकांची रक्कम हडपून दिल्ली, नोएडासह ठिकठिकाणी मोक्याच्या जमिनी घेतल्या. तेथे इमारतीही बांधल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदिल्ली, नोएडातही मालमत्ता : सेबी अन् सीबीआयनेही केली कारवाई

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात ठगवाजीचे नेटवर्क विस्तारून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा महाठग पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल सध्या नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक) कस्टडीत आहे. त्याने देशभरातील नागरिकांची रक्कम हडपून दिल्ली, नोएडासह ठिकठिकाणी मोक्याच्या जमिनी घेतल्या. तेथे इमारतीही बांधल्याची माहिती आहे.मध्य प्रदेशातील सेमरपाखा, ब्योहारी (जि. शहडोल) येथील मूळ निवासी असलेला बघेल कमालीचा धूर्त आहे. त्याने २००९ मध्ये सात मित्रांना गोळा करून साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने कंपनी निर्माण केली. प्रारंभी मध्य प्रदेशात आणि राजस्थानमधील जयपूरला या कंपनीचे मुख्यालय सुरू केले. कंपनीत फिक्स डिपॉझिट केल्यास एक लाखाला साडेपाच वर्षात दोन लाख, तर नऊ वर्षात तीन लाख रुपये देण्यासोबतच अपघाती विमा क्लेम देण्याचा तो दावा करीत होता. कंपनीच्या प्रचार प्रसारासाठी त्याने मोठ्या प्रमाणात एजंट नेमले होते. तेदेखिल चढवून बढवून माहिती देत गुंतवणूकदारांना सापळ्यात अडकवत होते. अशा प्रकारे २०१३ पर्यंत बघेलने कोट्यवधी रुपये गोळा केले. राजस्थान, मध्य प्रदेश, नोएडा दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यात तो नवनव्या शहरात कंपनीच्या शाखा उघडत होता. तेथून गोळा झालेल्या रकमेतून त्याने नोएडा, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी जमिनी विकत घेतल्या. त्यातील काहींवर भूखंड टाकले तर काही जमिनीवर त्याने इमारती उभ्या करून कोट्यवधीची मालमत्ता जमा केली.महाठग बघेलच्या फसवणुकीच्या नेटवर्कची माहिती मिळाल्याने सेबीने त्याची चौकशी सुरू केली. त्याचा व्यवहार संशयास्पद वाटताच त्याला नोटीस देऊन गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा करण्यास मनाई केली. दुसरीकडे बघेलच्या फसवणुकीच्या नेटवर्कची सीबीआयनेही चौकशी सुरू केली. बघेलची कंपनी घोटाळेबाज असल्याचे लक्षात येताच देशभरातील विविध प्रांतात कंपनीच्या शाखांवर सीबीआयने तीन वर्षांपूर्वी छापे मारले आणि महाठग बघेलवर कारवाई केली. त्याची ठिकठिकाणची सुमारे २५० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचीही माहिती आहे.देशात फसवणुकीच्या १४७ शाखासीबीआयच्या कारवाईनंतर महाठग बघेलचे देशभरातील नेटवर्क विस्कळीत झाले. गुंतवणूकदार त्याची ठिकठिकाणी तक्रार करू लागले. त्यानंतर त्या त्या ठिकाणच्या पोलिसांनीही त्याला अटक करण्यासाठी धावपळ सुरू केली. महाठग बघेलने देशातील विविध प्रांतात एकूण १४७ शाखा उघडून हजारो गुंतवणूकदारांची आयुष्याची कमाई गिळंकृत केली आहे.३१ महिन्यांपासून जेल यात्रामहाठग बघेलविरुद्ध विविध प्रांतातील शहरात आतापर्यंत २८ गुन्हे दाखल झाले. त्या त्या ठिकाणचे पोलीस बघेलला मोस्ट वॉन्टेड म्हणून शोधत आहे. त्याची ३१ महिन्यांपासून त्याची जेल यात्रा सुरू आहे. एकीकडचा तपास संपला की दुसरीकडचे पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेतात.भोपाळमध्ये अटकेचा प्रयत्नदोन वर्षांपासून बघेलला अटक करण्यासाठी धावपळ करणाऱ्या नागपूर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी त्याला भोपाळमध्ये अटक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तो यशस्वी झाला नाही. आता मात्र त्याला मध्य प्रदेशच्या शहाडोलमधून पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. नरके या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाCrimeगुन्हा