शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

आरोपी पुतण्याचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: March 02, 2016 3:22 AM

पाचपावली हद्दीतील हबीबनगर टेका येथील सख्ख्या काकाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. मुनघाटे ....

सत्र न्यायालय : टेका येथील खून प्रकरणनागपूर : पाचपावली हद्दीतील हबीबनगर टेका येथील सख्ख्या काकाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. मुनघाटे यांच्या न्यायालयाने आरोपी पुतण्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. मोहम्मद इमरान मोहम्मद ताहीर अन्सारी (१८), असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद शाकीर अब्दुल कादीर अन्सारी (२८), असे मृताचे नाव होते. १० आॅक्टोबर २०१५ रोजी शाकीरचा त्याचा मोठा भाऊ मोहम्मद ताहीर अब्दुल कादीर अन्सारी (५०) आणि पुतण्या मोहम्मद इमरान यांनी खून केला, असा आरोप आहे. वडिलांच्या मालमत्तेतून केले होते बेदखलमोहम्मद शाकीर याचा आपल्या भावांसोबत वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होता. मोहम्मद शाकीर हा पत्नी नुसरत परवीन (२६) आणि मुलांसोबत वडिलांनी बांधलेल्या इमारतीमध्ये राहत होता. ही इमारत शाकीरच्या वडिलांनी आपला शेवटचा मुलगा सलीम याच्या नावावर केली होती. वडिलांचा सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. मोहम्मद शाकीर हा आपल्या भावांना वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सा मागत होता. परंतु भावांनी त्याला हिस्सा दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. घटनेच्या एक दिवसआधी ९ आॅक्टोबर रोजी शाकीरचे आपला भाऊ ताहीर याच्यासोबत भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास शाकीर हा आपली पत्नी नुसरत परवीन हिला छतावर झोपण्यास जातो, असे सांगून गेला होता. काही वेळातच नुसरत परवीन हिला भांडणाचा आवाज ऐकू आला होता. लागलीच ती छतावर धावत गेली असता इमरान हा तिच्या पतीला पकडून ठेवून ताहीर हा दंडाने त्याच्या डोक्यावर प्रहार करीत असल्याचे दृश्य तिला दिसले होते. शाकीरच्या डोक्याच्या मागच्या भागावर प्रहार करताच तो खाली कोसळला होता. तिने आरडाओरड करताच इतर लोक धावून आले होते. लागलीच दोन्ही आरोपी पळून गेले होते. मेयो इस्पितळात शाकीरचा मृत्यू झाला होता. पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ११ आॅक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती. इमरान याने जामीन अर्ज दाखल करताच तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एन.आर. केंचे हे आहेत. (प्रतिनिधी)