संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा जामीन अर्ज फेटाळला

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 21, 2025 14:37 IST2025-03-21T12:45:49+5:302025-03-21T14:37:52+5:30

हायकोर्ट : राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेतली

Bail application of terrorist who conducted reconnaissance at RSS headquarters rejected | संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा जामीन अर्ज फेटाळला

Bail application of terrorist who conducted reconnaissance at RSS headquarters rejected

राकेश घानोडे
नागपूर :
रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करून ती माहिती पाकिस्तानमधील उमर याला पाठविणारा दहतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.

रईस जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पोरा येथील रहिवासी आणि जैश-ए-मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचा कट उघडकीस आला. मुख्य सरकारी वकील  ज्येष्ठ विधिज्ञ देवेंद्र चव्हाण यांनी रईसच्या दहशतवादी कनेक्शनबाबत न्यायालयाला ठोस माहिती दिली. रईसविरुद्ध यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत हातबॉंब बाळगल्याप्रकरणी खटला दाखल आहे. न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर रईसला जामीन नाकारला. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याला कारागृहात ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Bail application of terrorist who conducted reconnaissance at RSS headquarters rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.