हिंगणघाट नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जामिनपात्र वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:46 PM2018-03-19T22:46:03+5:302018-03-19T22:46:16+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणात हिंगणघाट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जामिनपात्र वॉरंट बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका प्रकरणात हिंगणघाट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जामिनपात्र वॉरंट बजावला. यशवंतनगर येथील सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण असून, ते अतिक्रमण हटविण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी-२०१५ मध्ये दिला होता. त्याचे पालन झाले नसल्यामुळे तक्रारकर्ते सुरेश भोयर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतरही मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: किंवा वकिलामार्फत न्यायालयात उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जामिनपात्र वॉरंट बजावण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. समीर सोहोनी यांनी बाजू मांडली.