शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
2
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
3
Hathras Stampede : २४ आश्रम, २५ वाहनांचा ताफा, १०० कोटींची संपत्ती; जाणून घ्या 'भोले बाबां'कडे नेमकं काय आहे?
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
5
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं
6
"पहिल्याच नजरेत प्रेम, लग्न, घर, मुलं..."; शहीद कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीचा भावूक करणारा Video
7
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा
8
जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर
9
MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...
10
"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं
11
Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना
12
Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद
13
धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
14
लक्झरीयस गाड्या अन् अलिशान घर; 'इतक्या' कोटींचे मालक आहेत दीपिका पादुकोण-रणवीर सिंग!
15
"संघात वारंवार बदल करणे पसंत नव्हते!"; रोहितसाठी सहायकाच्या भूमिकेत असल्याचे राहुल द्रविडचे मत
16
"अयोध्येत आम्ही राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला"; राहुल गांधींचे विधान
17
डेटिंग ॲप की हाॅटेलिंग स्कॅम? महागड्या हॉटेलमधील नवा स्कॅम समोर
18
अंबानी विवाह सोहळा : बीकेसीतील वाहतुकीत १२ ते १५ जुलैदरम्यान बदल
19
चौगुले समूहावर ईडीची छापेमारी; १९ हजार कोटी पाठवले परदेशी
20
संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान

By नरेश डोंगरे | Published: June 26, 2024 5:46 PM

नागपूर विभागातील नऊ बस स्थानकांनी मिळविले पुरस्कार : सर्वाधिक पुरस्कार भंडारा जिल्ह्याला

नरेश डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत नागपूर विभागांनी नऊ पुरस्कार मिळविले. पुरस्कार मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्हा अग्रेसर ठरला.

या अभियानांतर्गत 'ब' वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला २५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. 

मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १ मे,२०२३ ते ३० एप्रिल,२०२४ या कालावधीत राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर " हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान " राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, तयार करण्यात आले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात  आली आहे.    

ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील  प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी  निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्याचे ठरले होते. येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा उल्लेख करुन प्रमुखांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रदेशनिहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे.

स्पर्धेच्या वर्गवारीनुसार नागपूर विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या बस स्थानकांची माहिती खालील प्रमाणे आहे

टॅग्स :Nagpur Central Bus Standनागपूर मध्यवर्ती बसस्थानकnagpurनागपूरbhandara-acभंडारा