नागपूर : रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. या चौघांनीही या आंदोलनाला नेतृत्व दिले व त्यांच्या कार्यासाठी केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. नागपुरात पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बुधवारी बोलत होते.यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला जावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (एएचपी) अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते बुधवारी नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत अयोध्येत राममंदिराच्या निर्मिर्तीसाठी १५ सदस्यीय ट्रस्टची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी पत्रपरिषदेत भाष्य केले. गुजरातच्या सोमनाथ मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात हमीर सिंह गोहिल यांचे योगदान होते. सोमनाथ मंदिरात जाणारे भाविक देवदर्शनापूर्वी गोहिल यांच्या स्मारकाचे दर्शन घेतात. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर बनावे यासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या रामभक्तांचे अयोध्येत स्मारक बनविण्यात यावे, असे तोगडिया म्हणाले. पत्रपरिषदेला किशोर दिकोंडवार, अनुप जयस्वाल, तेजेंदरसिंह ठाकूर, हेमंत त्रिवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिला अत्याचार वाढलेयावेळी तोगडिया यांनी महाराष्ट्रातील हिंगणघाट तसेच औरंगाबाद येथे महिलांना जाळण्याच्या घटनांवरून केंद्रावर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या अपयशामुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अशी प्रकरणे ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालवून १०० दिवसांत निकाल जाहीर झाला पाहिजे. शिवाय दोषसिद्धीचा दरदेखील वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. देशाची अर्थव्यवस्थादेखील ‘आॅक्सिजन’वर आहे व देशाची सूत्रे योग्य व्यक्तीच्या हाती असती तर ही वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली.देशातील मुस्लिम करत आहेत भाजपचे ‘मार्केटिंग’‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून शाहीनबाग येथे मुस्लिम आंदोलन करत आहेत. प्रत्यक्षात भाजपमध्ये आता हिंदूंना प्रभावित करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे या हिंदूंना जागृत करून भाजपचे ‘मार्केटिंग’ करण्याचे काम शाहीनबागसारख्या आंदोलनातून होत आहे. याबदल्यात देशात ‘एनआरसी’ लागू करण्याची केंद्राची कुठलीही योजना नाही, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या घरी यासंदर्भात सर्व रूपरेषा तयार झाली, असा दावा डॉ. तोगडिया यांनी केला.भाजपाने हिंदुत्वाचे नुकसान केलेमहाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला काहीच हरकत नव्हती. शिवसेनेने प्रत्येक वेळी भाजपला साथ दिली होती. भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत हिंदुत्वाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे संघ परिवारानेदेखील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नुकसान केले असून यामुळे हिंदू चळवळीला मोठा धक्का बसला आहे, असेदेखील डॉ. तोगडिया म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंसह चौघांना भारतरत्न द्या : प्रवीण तोगडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 8:40 PM
रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्रदास आणि गोरखपूर पीठाचे महंत अवैद्यनाथ यांचे मौलिक योगदान होते. केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.
ठळक मुद्देदेशाची अर्थव्यवस्था ‘ऑक्सिजन’वर