'आज के शिवाजी नरेंद्र मोंदी' या पुस्तकावर बंदी आणा : काँग्रेस उतरली रस्त्यावर शहरभर निदर्शने, धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:39 AM2020-01-15T00:39:27+5:302020-01-15T00:41:30+5:30

‘आज के शिवाजी नरेंद्र मोंदी’ या पुस्तकावर बंदी टाकून लेखक जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फ शहरातील सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांच्या चौकाचौकात धरणे व निदर्शने करुन निषेध करण्यात आला.

Ban on 'Ajake Shivaji Narendra Modi' book : Congress landed on city streets | 'आज के शिवाजी नरेंद्र मोंदी' या पुस्तकावर बंदी आणा : काँग्रेस उतरली रस्त्यावर शहरभर निदर्शने, धरणे

'आज के शिवाजी नरेंद्र मोंदी' या पुस्तकावर बंदी आणा : काँग्रेस उतरली रस्त्यावर शहरभर निदर्शने, धरणे

Next
ठळक मुद्देलेखकावर गुन्हा नोंदवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोंदी’ या पुस्तकावर बंदी टाकून लेखक जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फ शहरातील सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांच्या चौकाचौकात धरणे व निदर्शने करुन निषेध करण्यात आला. 


नागपूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार, प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लेखकाच्या अटकेची आणि पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. भाजपाच्या मुख्यालयात पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावरुन वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनास भाजपाची संमती असल्याचे स्पष्ट होते. यामुळे जनभावना दुखावल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान दिवसभर शहरात सहाही विधानसभानिहाय ब्लॉक अध्यक्षांनी चौकाचौकात निषेध नोंदविला आणि धरणे देऊन निदर्शने केली. यात ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, अब्दुल शकील, ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य, राजेश पौनीकर, प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, रजत देशमुख, राजकुमार कमनानी, देवेद्र रोटेले, प्रमोदसिंग ठाकुर, सुरज आवळे, ईरशाद मलिक, सुनिता ढोले आदींचा पुढाकार होता.विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनात अ‍ॅड.अभिजित वंजारी, शेख हुसेन, अतुल लोढे, अशोक निखाडे, रवि गाडगे पाटील, किशोर गजभिये, वीणा बेलगे, किशोर गीद, संजय महाकाळकर, महेश श्रीवास, अतिक कुरैशी, मंसुर अन्सारी, अ‍ॅड.अभय रणदिवे, राकेश वैद्य, स्नेहल दहीकर, हफीज खा पठाण, सदानंद सपाटे, बबलु शेख, रंजना देशमुख, साहेबराव देशमुख, रामभाऊ कळंबे, सुभाष मानमोडे, पंकज शुक्ला, युगल विदावत, यशवंत तुळशीकर, अनंद गवठे, नईम शेख, किशोर गजभिये, धरम पाटील, बॉबी दहीवाले, इरशाद मलिक, शंकर देवगडे, फारुक मलिक, उमेश भिवगडे, तुफैल अन्सारी, शहजादे सिददीकी, इजहार अली, शेख हुसैन, मतीन अन्सारी साजिद कुरैशी, अकील खान, विजय इंगोले, रवि गौर, नफीसा सिराज यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

मानकापूर पोलिसात तकार
झिंगाबाई टाकळी झेंडा चौक येथे निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मराठा सेवा संघ, ओबीसी महासंघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीतील भाजपाचे नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ११ नोव्हेंबरला दिल्लीत झाले होते. या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. हा प्रकार म्हणजे छत्रपतींचा अपमान असून भावना दुखावणारा आहे. त्यामुळे या लेखकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात लक्ष्मण वानखेडे, पापाजी शिवपेठ, संजय भिलकर, जगदीश कोहळे, नागेश राऊत, सुभाष मानमोडे, अमित पाथरे, बंडू ठाकरे, श्रीराम तभाणे, रवी वराडे, कृष्णा गावंडे, प्रमोद ठाकूर, राम कांबळे, अविनाश ठाकरे, अविनाश शेरेकर, जगदीश गमे, प्रमोद वैद्य, अजय यावलकर, तन्मय भांगे, चेतन ढमदेरे, चेतन कोलते, नीलेश खोडे, रोशन कुंभलकर, अजय इंगोले, रत्नाकर कडू, अरविंद शिंदे, नरेंद्र खोरगडे, श्रावण इंगळे, हरीश गाडीगोणे, महादेव गायकी, राम वराडे, जितू सांबरे, प्रेम गेडाम, अजय गोडबोले आदी सहभागी झाले होते.

सी ए. रोड सेवासदन चौकात निदर्शने
मध्य नागपूर काँग्रेस ब्लॉक १८ चे अध्यक्ष गोपाल पट्टम व शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वात सीए रोड सेवा सदन चौकात धरणा व निदर्शने झाली. यावेळी शेख हुसैन, प्रा बाना बाकोड, रवी गाडगे पाटील, नगरसेवक जुल्फेकार भुट्टो, महेश श्रीवास, हाजी समीर, रमेश गुप्ता, मंसुर अन्सारी आदी सहभागी होते.

रामनगर चौकात निषेध
ब्लॉक अध्यक्ष देवेंद्र रोटेले यांच्या अध्यक्षतेखाली रामनगर चौकात हे आंदोलन झाले. संचालन राजकुमार कमलानी यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका पद्मा उईके, हरीश गालबन्सी, संदेश सिंगलकर, विलास भालेकर, हरी यादव, प्रकाश राव, नीलिमा दुपारे, योगेश येरमवार, पापा ठाकूर, राजेंद्र चौधरी, श्याम सोनेकर, अ‍ॅड. महेश रामटेके, सुरेंद्र उमरेडकर, चंदन पांडे, बबलू तिवारी, सुभाष मेश्राम, सत्यम सोडगीर, स्वप्निल निमजे, राजेंद्र राऊत, अनिकेत सोडगीर, शुभम मानेकर, आकाश खोब्रागडे सहभागी होते.

Web Title: Ban on 'Ajake Shivaji Narendra Modi' book : Congress landed on city streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.