लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सार्वजनिक रंगपंचमीवर मनपा प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच खासगी व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळी मीलन व विविध प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. नियमांचे कठोर पालन करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. याचा विचार करता शहरात पोलिसांनी ६६ ठिकाणी नाकाबंदी तर ७५ ठिकाणी फिक्स पॉईंट तयार केले आहेत. तसेच सोसायटी, अपार्टमेंट येथे आयोजित कार्यक्रमांवर नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा जल्लोष व गोंधळ खपवून घेतला जाणार नाही. अशा लोकांवर पोलीस व मनपा प्रशासनातर्फे कारवाई केली जाणार आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्बंध लावले आहेत. धुळवड व शब- ए-बारात उत्सवाबाबत विशेष आदेश काढले आहेत. धुळवळीसाठी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. सार्वजनिक धुळवड साजरी करण्याला तसेच मिरवणूक काढण्याला बंदी आहे. नियमाचे उल्लघन करणाऱ्यांवर दंडात्मक व पोलीस कारवाई केली जाणार आहे. घरी राहून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. रंगपंचमीच्या दिवशी स्टॅन्ड अलोन स्वरूपातील मटण, मासे, अंडी, भाजीपाला व किराणा दुकाने दुपारी १ पर्यंत सुरू राहतील. दुकान, हॉटेल, रेस्टरंट सुरू ठेवण्याची वेळ निर्धारित केली आहे. बाईकवर फक्त चालविणाऱ्यालाच अनुमती आहे. कारमध्ये १ १ असा फाॅर्म्युला लागू राहणार आहे. बाजार, आस्थापना, खासगी कार्यालये बंद राहतील. असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
...
आज हे बंद राहील
खासगी आस्थपना, कार्यालये बंद राहतील.
दुकाने, मार्केट बंद राहील.
वाचनालये, अभासिका बंद राहतील.
रेस्टारंट, हॉटेल, खाद्यगृहातील डायनिंग सुविधा बंद, पार्सल सुविधा सायंकाळी ७ पर्यंत.
स्टॅन्ड अलोन स्वरूपात भाजीपाला, किराणा, मांस, अंडी दुकाने दुपारी १ पर्यंत सुरू राहतील.
..
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याला बंदी (शासकीय, निमशासकीय व आवश्यक सेवा कार्यालये वगळून)
सार्वजनिक तसेच खासगी ठिकणी सार्वजनिकरीत्या धूलिवंदन, शब-ए-बारात साजरी करण्याला मनार्ई.
मिरवणूक काढण्याला मनाई.