शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?
2
"वारे उबाठा तुझं हिंदुत्व...! आरे आम्हाला सांगा, आम्ही बिनविरोध निडून देतो, पण...; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
3
अजित पवारांना भाजपने उमेदवारासहित जागा का दिल्या? विनोद तावडेंनी सांगितलं कारण
4
ओबीसी, दलितांचे आरक्षण कमी करुन ते मुस्लिमांना देण्याचा महाविकास आघाडीचा घाट - अमित शाह
5
मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला
7
'बटोगे तो कटोगे',भाजपाच्या कार्यकर्त्यांने थेट लग्नपत्रिकेवरच सीएम योगींचा नारा छापला
8
कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन
9
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
10
बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
11
किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल
12
१९ वर्षांनी तो परत येतोय! मुकेश खन्नांनी शेअर केली 'शक्तिमान'ची पहिली झलक, पाहा व्हिडीओ
13
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
14
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
15
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
16
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
17
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
19
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
20
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

कानठाळ्या बसविणारा आवाज, लेझर लाईटवर प्रतिबंध घाला

By निशांत वानखेडे | Published: September 07, 2024 6:05 PM

Nagpur : ग्रीन प्लॅनेट साेसायटीची सरकारकडे मागणी

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : ध्वनी प्रदूषणाविराेधात कायदा असूनही पाेलीस व जिल्हा प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना त्रास हाेताे. अलीकडे लेझर लाईटचे समाजात फॅड आलेले आहे. या डाेळ्यांवर विपरित परिणाम करणाऱ्या लेझर लाईट व कानठाळ्या बसविणाऱ्या आवाजावर सरसकट प्रतिबंध घालण्याची मागणी ग्रीन प्लॅनेट साेसायटीने सरकारकडे केली आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा २००० अस्तित्वात आहे. त्यात कडक नियम घालून दिलेले आहेत, पण लाेक त्यांचे पालन करीत नाही. दवाखाने, शाळा, न्यायालये अशा संवेदनशील ठिकाणी मोठा आवाज करू नये असे नियम आहेत. नियमाप्रमाणे उद्योग क्षेत्रात ७०-७५ डेसिबल, व्यावसाईक क्षेत्रा ५५-६५ आणि रहिवासी क्षेत्रात ४५-५५ डेसिबल आणि सायलेन्स झोनमध्ये ४० ते ५० डेसिबलची मर्यादा आहे. सर्वसाधारण मर्यादा ६० डेसिबल असावी. परंतू सन आणि उत्सवात डीजेचा आवाज १०० डेसिबल किंवा त्याहून अधिक असताे. याविराेधात कठाेर कारवाई हाेत नाही. सरकारने कायद्याच्या कठाेर अंमलबजावणीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट साेसायटीचे प्रा. सुरेश चाेपणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ध्वनी प्रदूषणाचे परिणामकानाचे पडदे फाटणे, कानात सतत आवाज येत असणारा टीन्नीटसं विकार, रक्त दाब वाढणे, हॉर्ट अटॅकचा धाेका आणि मानसिक समस्या निर्माण होतात. घटनेच्या क्रिमिनल प्रोसिजर कोड, सेक्शन १३३ नुसार सार्वजनिक ठिकाणी आवाजाचा गोंधळ घालून लोकांना त्रास देणे हा गुन्हा आहे. इंडियन पिनल कोड चॅप्टर १४- कलम २६८, २८७, २९०, २९१ आणि २९४ नुसार अश्या नागरिकावर कारवाही करता येते.

लेझर लाईटच्या वापरावर हवे नियंत्रण

  • लेझर लाईट हे डोळ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे.
  • व्हीझीबल आणि इन्फ्रारेड लाईट, ४०० ते १४०० नानोमिटर लेझर लाईट बीम ही डोळ्याच्या रेटीनासाठी धोकादायक आहे.
  • यामुळे डोळ्याच्या रेटीनल, फोटो केमिकल आणि कॉर्नियलला न भरून निघणारी इजा होते.
  • ४००-५०० नेनोमिटर रेंज मधील अर्गोन आणि व्हेग लेझर हे विशेषता डोळ्यासाठी धोकादायक आहे.
  • क्लास २ व्हीसिबल लाईटच्या सतत वापरानेसुद्धा धोका होऊ शकतो.
  • सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास विमान संचालनासाठी सुद्धा धोकादायक असल्याने डीजीसीएने त्यावर बंदी घातली आहे.
टॅग्स :nagpurनागपूरGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024