लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे.कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. यात बँडवाल्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, मार्च ते जून या चार महिन्यात लग्न समारंभाचा धुमधडाका असतो. या चार महिन्याच्या कमाईवर अनेक वाजंत्र्यांचा वर्षभराच्या कुटुंबाचा खर्च चालतो. चारपैकी तीन महिने निघून गेल्यामुळे या व्यवसायात असलेल्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. अलीकडे लग्न समारंभाला सशर्त परवानगी मिळाली आहे. मात्र, ब्रँड बाजाला स्थान नव्हते. त्यामुळे नागपुरातील बँड पार्टीच्या संचालकांनी प्रशांत खंडारे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली. आम्हालाही परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली. त्यांचा विचार करून आयुक्तांनी त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यामुळे आता नागपूर शहरात तीन महिन्यानंतर ‘बँड बाजा बारात’ पाहायला मिळणार आहे. बँडवाल्यांचं आर्थिक संकट पाहून नागपूर पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी हा दिलासाजनक निर्णय घेतला आहे.लग्नाला आणि त्यात बँडवाल्यांना परवानगी दिली असली तरी त्यांना काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. लग्नात केवळ ५० पाहुण्यांना आमंत्रित करता येणार आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी बँडवाल्यांनादेखील फिजिकल डिस्टन्सिंंग आणि स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. वर किंवा वधू पित्याला लग्नासाठी समारंभात बँडवाल्यांना याच अटीवर बोलावता येणार आहे.अनेक कुटुंबाचा ताळेबंद विस्कळीतलॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून बँडवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या बँड वाजविणाऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभं राहिलं आहे. ते लक्षात घेता ५० पाहुण्यांच्या अटीचं पालन करीत वधू किंवा वर पित्याला लग्न समारंभात बँड पथकाला बोलावता येणार आहे.
नागपुरात आता लग्नात ‘बँड बाजा’ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 7:50 PM
लग्न समारंभ आणि वरातीत आता बँड बाजालाही परवानगी मिळाली आहे. बँडचा व्यवसाय करणाऱ्यांवर कोरोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. ती लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी बँड पथकाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाला सशर्त परवानगी दिली आहे.
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचा निर्णय : बँड पार्टीवाल्यांना दिलासा