शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

जिल्हा बँकेला बँकिंग व्यवहाराची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 3:29 AM

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केंद्र शासनाच्या जिल्हा बॅकांचे पुनरुज्जीवन योजनेंतर्गत बँकेला प्राप्त निधीद्वारे बँकिंग परवान्यासाठी सीआरएआर किमान ७ टक्के अटीची पूर्तता केली आहे.

सर्व ठेवी सुरक्षित : सुधारित व्याजदराने नूतनीकरणनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केंद्र शासनाच्या जिल्हा बॅकांचे पुनरुज्जीवन योजनेंतर्गत बँकेला प्राप्त निधीद्वारे बँकिंग परवान्यासाठी सीआरएआर किमान ७ टक्के अटीची पूर्तता केली आहे. बँकेचा सीआरएआर ७ टक्के राखण्याकरिता शासन व नॉबार्ड कडून १५६.५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. यात ५२.७० कोटी केंद्र, ९०.६८ कोटी राज्य शासन आणि १३.१७ कोटी नाबार्डकडून प्राप्त झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्याधिकारी (प्रशासन) यांनी एका पत्रकाद्वारे बुधवारी दिली.निर्बंध पूर्णत: मागेबँकेने बँकिंग परवाना मिळण्याकरिता आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनी १४ मार्च २०१६ ला बँकिंग परवाना प्रदान केला आहे. बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ चे कलम ३५ (ए) आणि २२ (५)(ब) नुसार बँकेवर लावलेले निर्बंध मागे घेतले आहे. त्यामुळे आता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकिंग व्यवसाय करण्यास मोकळी झाली आहे.बँकेची आर्थिक स्थितीबँकेचे भागभांडवल २२१.३४ कोटी, बँकेचा निधी २१.७५ कोटी, ठेवी ८७६.०९ कोटी, गुंतवणूक ५०९.९५ कोटी, कर्ज ६१३.८८ कोटी, नेटवर्थ ३७.७० कोटी, सीआरएआर १०.८६ टक्के आहे. बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित आहेत. गरजवंत ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात आवश्यक धोरण ठरविण्यात येत आहे. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर नियमानुसार व्याज देण्यात येईल. कोणत्याही ठेवीदाराचे व्याजाचे नुकसान होणार नाही, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.बँकेचे जे शेतकरी सभासद त्यांचेकडील कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करतील त्यांना ४८ तासांच्या आत एक लाख रुपयापर्यंत खरीप हंगामासाठी कर्ज वितरण करण्यात येईल. हे कर्ज वाटप करतांना सभासदांना सेवा सहकारी संस्था किंवा थेट कर्ज पुरवठा यापैकी कोणत्याही एका मार्गाने कर्ज पुरवठा करण्यात येईल. यामुळे शेतकरी सभासदांना शासनाच्या बिनव्याजी कर्ज सवलतीचा लाभ घेता येईल. ज्या ठेवीदारांकडे किंवा त्यांचे कुटुंबातील व्यक्तीकडे बँकेचे कर्ज बाकी आहे अशा कर्ज खात्यात ठेवीदाराचे संमतीने ठेवी वळती करता येतील. बँकेच्या प्रगतीचे दर १५ दिवसांनी पत्रक काढणारशेतकऱ्यांना शेतीशिवाय इतर गरजा भागविण्यासाठी दिलेल्या किसान उन्नती कर्ज खात्यावरील व्याजाचा भरणा करून घेऊन त्यांचे कर्ज खातेसुद्धा नियमित करण्यात येईल. बँकेचे प्रगतीबाबत दर १५ दिवसांनी पत्रक काढण्यात येईल. यात बँकेच्या ठेवी, कर्ज, निधी, नेटवर्थ व सीआरएआर या आर्थिक स्थितीचा तपशील देण्यात येईल. तसेच बँकेच्या नियोजित योजनाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.ठेवीचे नूतनीकरणबँकेचे बँकिंग व्यवहार मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने ज्या मुदती ठेवीची इश्यू डेट संपलेली आहे व त्याचे नूतनीकरण त्याच्या इश्यू डेटच्या तारखेपासून आजपर्यंत कालावधीकरिता ९ टक्के व्याजदराने करण्यात येणार आहे. यापुढे सुधारित व्याजदराने त्याचे नुतनीकरण करण्यात येईल. बँकाचे व्यवहार बंद असल्याने मंजूर कर्जमर्यादेवर व्यवहार होऊ न शकल्याने कर्ज थकीत झाले आहे. अशा कर्जदारांकडून ड्यू झालेल्या व्याजाचा भरणा करून त्यांचे कर्ज खात्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती अंतर्गत शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर विभागातील कार्यरत कर्मचारी यांना बँकेने दिलेल्या बचत ठेव ओडी व इतर कर्जाची त्यांच्या पगारातून कपात केलेल्या रकमेचे धनादेश पंचायत समितीकडून प्राप्त होताच संबंधित कर्मचाऱ्यांचे कर्ज खात्याला जमा खर्च घेऊन ते कर्ज खाते नियमित करण्यात येईल.