तारण असलेल्या जमिनीवर नव्याने कर्ज : पोलिसांकडून होणार चौकशी नरेश डोंगरे नागपूरस्वत:ची पत्नी, सासरे, मामा अन् त्यांच्यासह अनेक नातेवाईकांची फसवणूक करणारा महाठग रजनीश सिंग याच्या बनवाबनवीला संबंधित बँकांमधील काही अधिकाऱ्यांचा हातभार असल्याचा संशय आहे. हा संशय निर्माण करणारे मुद्दे पोलीस चौकशीत अधोरेखित झाल्यामुळे संबंधित बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेचे पोलीस येत्या काही तासात पत्र पाठविणार असून, बँकेकडे गहाण (तारण) पडलेल्या जमिनीवर वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे बँक अधिकाऱ्यांनी नव्याने कसे काय कर्ज उपलब्ध करून दिले, अशी विचारणा करणार आहेत. दरम्यान, पोलीस चौकशीला सामोरे जावे लागणार, अशी कुणकुण लागल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.स्वत:च्या नातेवाईकांसह अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग रजनीश अयोध्याप्रसाद सिंग याच्या गुन्हेशाखेच्या (ईओडब्ल्यू ) पथकाने शुक्रवारी सकाळी मुसक्या बांधल्या. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या दोन दिवसांच्या तपासात महाठग रजनीशने पोलिसांनाही उल्लू बनविण्याचा प्रयत्न केला. आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्यांची आपण कसलीही फसवणूक केली नाही. ज्या तिघांनी फसवणुकीचा आरोप लावला आहे, त्यांना आपण कंपनी उघडून दिल्याचा दावा त्याने चौकशी करणाऱ्या पोलिसांसमोर केला. एमआयडीसीत कोट्यवधींच्या जमिनीसह संबंधित व्यक्तींची कंपनी उभी असल्याचेही त्याने छातीठोकपणे पोलिसांना सांगितले. त्याच्या दाव्यामुळे काही वेळेसाठी चौकशी अधिकारीही चक्रावले. त्यांनी तक्रारकर्त्या तिघांना वेगवेगळ्या वेळी बोलवून घेतले अन् प्रत्येकाला कुठे जमीन खरेदी करून कंपनी लावून दिली, त्याबाबत विचारणा केली.
रजनीशच्या ठगबाजीला बँकेचा हातभार ?
By admin | Published: March 27, 2017 2:03 AM