शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

नागपूर जिल्ह्यात खरीप कर्जासाठी बँकांनी कर्जवाटपाचा वेग वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:44 PM

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर व सुलभपणे कर्ज पुरवठा करताना जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही तसेच कर्ज वाटपाचा वेग वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना दिल्या.

ठळक मुद्देअश्विन मुदगल : प्रत्येक गावात कर्ज मेळावे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर व सुलभपणे कर्ज पुरवठा करताना जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही तसेच कर्ज वाटपाचा वेग वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.१,०६६ कोटींचे उद्दिष्टमुदगल म्हणाले, जिल्ह्याला खरीप हंगामासाठी १,०६६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १२ हजार ८०२ खातेदारांना १३३.०९ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे अत्यल्प कर्जवाटप झाले असून, बँकांनी प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊन दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठ प्रतिनिधींना केले.तालुकास्तरावर मेळावेबँकांना राष्ट्रीयीकृत, खासगी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जपुरवठा करण्यासाठी तालुकास्तरावर कर्ज मेळावे आयोजित करावेत, यासाठी महसूल व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयातर्फे आवश्यक संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, खते तसेच आवश्यक साहित्य खरेदी करताना बँकांनी खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्जपुरवठा करताना एकही पात्र शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कर्जपुरवठा करताना ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.३० जूनपूर्वी ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण कराबँकांच्या वरिष्ठ प्रतिनिधींना सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांनी ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील ४० टक्के शेतकºयांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. सर्व बँकेच्या प्रतिनिधींनी दर आठवड्यात शुक्रवारी तालुकास्तरावर होणाºया बैठकीत उपस्थित राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप योजनेत सहभागी करावे. तहसीलदार, महसूल अधिकाऱ्यांनी बँकेचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित राहतात किंवा नाही याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.उद्दिष्टानुसार केवळ ११ टक्के कर्जपुरवठाजिल्ह्याला पीक कर्जासाठी असलेल्या उद्दिष्टानुसार केवळ ११ टक्के कर्जपुरवठा झाला आहे. अत्यंत कमी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये अलाहाबाद ४ टक्के, आंध्र बँक २६ टक्के, बँक आॅफ बडोदा २० टक्के, बँक आॅफ इंडिया १२ टक्के, बँक आॅफ महाराष्ट्र २० टक्के, कॅनरा बँक ८ टक्के, सेंट्रल बँक १९ टक्के, देना बँक १८ टक्के, आयडीबीआय १० टक्के, इंडियन ओव्हरसिस बँक १३ टक्के, पंजाब नॅशनल बँक २ टक्के, स्टेट बँक आॅफ इंडिया ३ टक्के, सिंडीकेट बँक ११ टक्के, युको बँक ४ टक्के, युनियन बँक १४ टक्के, एचडीएफसी १२ टक्के, आयसीआयसीआय १० टक्के, इंडसइंड बँक ६ टक्के तसेच विदर्भ कोकण ग्रामीण बँक १४ टक्के, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १४ टक्के आदींचा समावेश आहे. सर्व बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवून जास्तीत जास्त कर्जपुरवठा कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.५८,२८६ शेतकऱ्यांना कर्जमाफीशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८,२८६ शेतकºयांना कर्जमाफी दिली आहे. या सर्व शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, संपूर्ण कर्ज माफ झालेले ४२,५४० शेतकरी आहेत. त्यांना थेट कर्ज उपलब्ध करून देण्यास कुठलीही अडचण नाही. या शेतकऱ्यांना सर्वप्रथम पीक कर्जाचा लाभ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.बैठकीत उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, अग्रणी जिल्हा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक अयुब खान, माधव चंद्रीकापुरे, जिल्हा उपनिबंधक अधिकारी अजय कडू उपस्थित होते.

टॅग्स :collectorतहसीलदारFarmerशेतकरी