- नरेश डोंगरेनागपूर - ईतवारी नागभिड नॅरोगेज लाईनला ब्रॉड लाईन बनविण्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआईआई) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात उमरेड ते भिवापूर दरम्यान सुमारे ६.५ किलोमिटरच्या दुसऱ्या भागात वन्य प्राण्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी अंडरपास बनिवले जाणार आहे.
ब्रॉडग्रेज लाईनवरून गाड्यांची गती या क्षेत्रात कायम ठेवण्यासाठी सुरक्षेचे अन्य उपायसुद्धा केले जाणार आहे. दोन टप्प्यात केल्या जाणाऱ्या या कामाचा पहिला टप्पा ईतवारी ते उमरेड पर्यंत ६१ किलोमिटरचा आहे. जून २०२४ पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या पहिल्या टप्प्यात ईतवारी, दिघोरी, कुही, बामहानी रेल्वेस्थानक राहतील.दुसऱ्या ५५ किलोमिटरच्या टप्प्यात उमरेड ते नागभिड या दोन स्थानकांच्या मध्ये टेम्पा स्थानक असेल. हे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सूत्रांच्या मते, वाइल्डलाइफ क्लियरेंस नंतर संबंधित क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मंथन सुरू आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआईडीसी) हे काम करीत आहे. या प्रकल्पासाठी १४०० कोटींची तरतुद होती मात्र विलंबामुळे आणि अन्य कारणांमुळे त्यात १०० कोटींची भर पडणार असल्याचे सांगितले जाते. वैशिष्ट्ये ...- ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसोबतच कोळसा वाहतूकीतून मोठा महसूल मिळणारमोठ्या लाईनमुळे रेल्वेगाड्यांची गती वाढणार.- वेकोलि चंद्रपूर आणि उमरेड क्षेत्राच्या कोळसा खदानीतून कोराडी तसेच तिरोडा पॉवर प्लान्टपर्यत कोळसा वाहतूकीला गती देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.