खापा : सावनेर तालुक्यातील नांदाेरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनाेज बन्साेड यांची वर्णी लागली आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव झाले. मनाेज बन्साेड यांची सरपंचपदी बिनविराेध निवड झाली.
नांदाेरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाले होते. संबंधित प्रवर्गातील एकही उमेदवार येथे नसल्यामुळे सरपंचपद रिक्त हाेते. दरम्यान, ८ मार्च राेजी तहसील कार्यालयात सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. त्यानुसार साेमवारी झालेल्या निवडणुकीत मनाेज बन्साेड यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली.
ग्रामपंचायतमध्ये एकूण सातही जागा काँग्रेस समर्थित गटाच्या आहेत. मनाेज बन्साेड हे दुसऱ्यांदा सरपंचपदाचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी २०१२ मध्ये सरपंचपदाची धुरा सांभाळली हाेती. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी के.एच. कनाेजे यांनी काम सांभाळले. यावेळी ग्रामसेवक दत्ता हरी तरटे, उपसरपंच दीपक पिंगे, ग्रामपंचायत सदस्य विजय डाखरे, मंगला काेंगरे, श्यामला घाेरमारे, कल्पना चटप, चंद्रकला मुरकुटे, ग्रामपंचायत कर्मचारी धाेंडबा माेजनकर तसेच अनिल येलेकार, प्रफुल्ल मुरकुटे, यशवंत चाैधरी, दिवाकर ढाेके, राेशन येलेकार, मयूर चटप, लाेभा ताजणे, प्रवीण घाेरमारे, रमेश काेंगरे, बाबाराव घाेरमारे, हेमराज डाखरे, प्रभाकर वाडी, ज्ञानेश्वर धराडे, नाना पिंगे, प्रमाेद धनवटे आदी उपस्थित हाेते.