शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

बाप्पा येतोय सुख आणि समृद्धी घेऊन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:12 AM

कळमेश्वर : कोरोनामुळे गतवर्षी गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र भाविकांनी घातलेल्या साकड्याला साद देत १० सप्टेंबरला बाप्पांचे आगमन ...

कळमेश्वर : कोरोनामुळे गतवर्षी गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र भाविकांनी घातलेल्या साकड्याला साद देत १० सप्टेंबरला बाप्पांचे आगमन होत आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून यंदाही गणेशोत्सव साजरा होईल. मात्र ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने बाप्पा यावे‌ळी सुख, समृद्धी घेऊन येत असल्याची आशा बाळगत संकटात सापडलेले मूर्तिकार गणेशमूर्ती साकारण्यात तल्लीन झाले आहेत. इंधन दरवाढ, माती, रंग आदींचे दर वाढल्याने मूर्तीचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्यता मूर्तिकारांनी वर्तविली आहे.

कळमेश्वर तालुक्यात उपरवाही येथे दहापेक्षा अधिक मूर्तिकार बाप्पांना आकार देण्याच्या कामात गत पाच महिन्यांपासून गुंतलेले आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी चिक्कण माती, लाकूड, पाट्या, कापूस, पोते, डिंक, विविध रंग यासह अन्य साहित्याची आवश्यकता भासते. कच्ची मूर्ती तयार करण्यासाठी साधारणतः चार ते पाच दिवसाचा काळ लागत असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली. मूर्तिकार मनीष बोरसरे यांनी सांगितले की त्यांचा परंपरागत व्यवसाय असून त्यांच्याकडे दरवर्षी श्री गणेश, दुर्गा देवी, शारदा देवी आणि दिवाळीनिमित्त वापरण्यात येणाऱ्या श्री लक्ष्मी देवीच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तीला लागणाऱ्या मातीची व्यवस्था मार्च महिन्यातच केली जाते. अगोदर ती लोणारा आणि आष्टीकला शिवारातून सहज उपलब्ध होत होती. परंतु त्या शेतजमिनी शेतकऱ्यांनी वहिवाटीत आणल्याने मातीची समस्या निर्माण झाली. आता नरखेड तालुक्यातील सावरगाव येथून माती आणावी लागते. याकरिता एका बोलेरो पिकअप गाडीसाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येत असून एका मूर्तिकाराला किमान १५ ते २० हजाराची माती लागते. त्यांच्याकडे एक फुटापासून तर सात फूट उंच मूर्ती ऑर्डर प्रमाणे तयार केली जाते. परंतु गतवर्षी पासून कोरोना नियमावलीप्रमाणे घरगुती मूर्ती दोन फूट व सार्वजनिक मूर्ती चार फूट उंच ठेवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. याचा फटका मूर्तिकारांना बसतो आहे. उपरवाही येथे मनीष बोरसरे, गोपाल कपाट, अरुण कपाट, विजय खोबरे, दिलीप मराठे, रामकृष्ण बोरसरे, ईश्वर कपाट, मुकेश तांबेकर, प्रल्हाद खोबरे, भीमराव खंडारे मूर्ती तयार करण्याचे काम करतात. प्रत्येक मूर्तिकार गणपतीच्या किमान २५० ते ३०० मूर्ती तयार करतो. त्यामुळे येथे दरवर्षी किमान ३ हजाराच्या जवळपास मूर्ती तयार होतात. यातील अर्धेअधिक मूर्ती गावातूनच विकल्या जातात. उर्वरित मूर्ती विक्रीसाठी कळमेश्वर येथे पाठविल्या जातात.

या मूर्तीला आहे मागणी

मूर्ती तयार करताना ग्राहकांची आवडनिवड विचारात घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेशातील फेटा बांधलेला गणपती, तिरुपती बालाजी सारखा गणपती, पंचमुखी भुजंग असलेला गणपती अशा विविध आकारातील मूर्तींना विशेष मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. सध्या येथील मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मूर्तीला रंग देण्याच्या कामाला आठ दिवसानंतर सुरुवात करण्यात येणार आहे. सतत भेडसावणारी माती समस्या दूर करण्यासाठी शासनाने रॉयल्टी तत्त्वावर माती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे.

पर्यावरणाला धोका नाही

उपरवाही येथील मूर्तिकार माती व पर्यावरणपूरक रंग वापरून मूर्ती बनवीत असतात. या मूर्तीच्या विसर्जनाने पर्यावरणाला कसलाही धोका निर्माण होत नाही. तर दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तसेच मातीच्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक दिसत असल्याने नागरिकही पर्यावरणाचा विचार न करता आकर्षित होतात. यामुळे सहा महिने मेहनत करून मातीची मूर्ती तयार करणाऱ्या पारंपरिक मूर्तिकारांवर भविष्यात व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी येथील मूर्तिकारांनी केली आहे.