शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रक्तबंबाळ बापूंची अडीच किलोमीटर पायपीट

By admin | Published: October 26, 2015 11:12 PM

कळसरीच्या रानातून... : सांबरवाडीजवळ तांबट, गेळा, तोरणांच्या पानांवर रक्ताचं शिंपण; बिबट्याने उडवला थरकाप --आॅन दि स्पॉट

राजीव मुळ्ये -सातारा--पूर्वेला पाटेकर यांची पडीक जमीन, पश्चिमेला सपकाळ यांची जमीन, दक्षिणेला कडा भाग, उत्तरेला काळेश्वरी मंदिर... ओल्या शाईतून उतरणारी पंचनाम्याची कोरडी भाषा अन् साक्षीला कड्याजवळून तोडून आणलेल्या ओल्या पानांवरचं सुकलेलं रक्त. गणपत अण्णा भणगे ऊर्फ बापूंचं! बिबट्याच्या तीक्ष्ण नखांनी ओरबाडून काढलेलं...वयाच्या सत्तरीत हातातला विळा गवतावर सपासप चालवत असताना सांबरवाडीच्या बापूंवर रविवारी बिबट्याने हल्ला केला. गोठ्यातल्या गुरांची गरज बापूंना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कड्याकडे घेऊन गेली आणि घात झाला. गावाला बिबट्याचं दर्शन नवीन नाही; पण गंभीर जखमी अवस्थेत बापू ज्या हिकमतीनं अन् चिकाटीनं गावापर्यंत पोहोचले, ती शहरी मंडळींसाठी निश्चितच नवीन आहे. गावापासून काळसरीच्या रानाचं अंतर आहे अडीच किलोमीटर. गावापासून तीव्र चढण चढून थोडं वर गेल्यावर लाल मातीनं व्यापलेला सडा. पुरुषभर उंच गवतातून जाणारी पाऊलवाट मध्येच लुप्त होणारी. गवतात कोणताही वन्यप्राणी दबा धरून बसला असेल, तरी दिसू शकत नाही, अशी स्थिती. भूमिपुत्रांची काळजी वाहणाऱ्या काळेश्वरीच्या मंदिरापासून पुन्हा चढण. थेट काळ्या कड्यापर्यंत. याच परिसराचं नाव ‘काळसरीचं रान’... काळेश्वरी देवीवरून पडलेलं! साताऱ्याचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे, वनपाल सुनील भोसले, वनरक्षक प्रशांत पडवळ, दीपक गायकवाड, नीलेश रजपूत, मारुती माने सोमवारी सकाळी काळसरीकडे धावले. सांबरवाडीचे सरपंच संतोष भोसले, पोलीस पाटील संपत भोसले, लक्ष्मण भणगे, रमेश ढवळे, मनोहर सावंत, किरण भणगे, सुनील भणगे, हणमंत फडतरे, शंकर पारटे ही ग्रामस्थ मंडळी वाट दाखवायला बरोबर आलेली. मोबाइलला रेंज मिळेल तेव्हा गावात फोन करून नक्की जागा विचारत सगळे खुणेच्या झाडापर्यंत पोहोचले. शिकेकाईच्या या झाडापासून काळा कडा अगदीच जवळ. चढणीवरच्या उंच गवताच्या कुरणाजवळच करवंद, तांबट, गेळा, तोरणं अन् घाणेरीची गच्च झुडपं. याच झुडपातून बिबट्यानं बापूंवर झेप घेतली. बिबट्याशी झुंजत असताना बापूंनी मदतीसाठी केलेला धावा गावापर्यंत पोहोचूच शकला नाही. पण बापूंनी गंभीर जखमा होऊनही अडीच किलोमीटर कापून गाव गाठलंच.बापूंवरचा धोका टळलाबापूंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्यावरील धोका टळल्याचं जिल्हा रुग्णालयातल्या सूत्रांनी सांगितलं. देवा-धर्माची प्रचंड ओढ असलेल्या बापूंची गावकरी वाट पाहत आहेत. भजन गाण्यासाठी बापू कितीही लांब, कुणाकडेही जाऊ शकतात, असं सांगणाऱ्या लहान-थोरांना बापूंवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा धक्का बसलाय. दरम्यान, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन बापूंची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. बापूंना पाच हजार रुपयांची तातडीची मदतही देण्यात आली आहे.भुईमुगाच्या रानात आता फक्त कुसळकाळेश्वरी देवीच्या पठारावर पूर्वी भुईमुगाचं मोठं उत्पादन होत असे. लाल मातीत पिकलेला शेंगदाणा चवीला बदामापेक्षा सरस होता. काळ बदलला अन् गावातल्या तरुणाईनं मुंबईचा मार्ग धरला. गावात आता वयोवृद्ध, महिला आणि मुलांची संख्या अधिक. भुईमुगाच्या माळावर आता उंचच उंच कुसळाचं गवत... उशाला काळा कडा अन् कपारीत दबा धरून बसलेली मूर्तिमंत भीती!वनखात्याची प्रबोधन मोहीम सुरूनागरी वस्तीजवळ मुक्काम ठोकणाऱ्या बिबट्यांचा (लेपडर््स आॅफ सिव्हिल सोसायटी) प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालल्याची सूचना ‘लोकमत’ने वारंवार दिली आहे. साताऱ्याजवळील डोंगराळ गावंच नव्हे, तर शहरी भागातही बिबट्याचं दर्शन घडण्याचं प्रमाण वाढू लागलंय. तातडीने योजण्याच्या काही उपायांची चर्चा ‘लोकमत’ने सुमारे वीस दिवसांपूर्वीच केली होती. आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रबोधन आणि प्रशिक्षणासह चार महत्त्वाचे उपाय सुचविण्यात आले होते. त्या दिशेनं वनखात्याने आता ठोस वाटचाल सुरू केली असून, ‘बिबट्याप्रवण क्षेत्र’ दर्शविणारा पहिला फलक बापूंवरील हल्ल्याच्या निमित्ताने सोमवारी सांबरवाडीतच लावण्यात आला.काळसरीच्या रानाकडून बापू रक्तबंबाळ होऊन वेगानं चालत गावाकडे निघाले होते, तेव्हा मी गायरानात होतो. बापूंना त्या अवस्थेत बघून मी विचारलं, काय झालं? पण बापू काही न बोलता वेगात गावाकडे निघून गेले. नंतर समजलं की त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय.- शिवाजी भोसले, ग्रामस्थ