लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारच्या मॅनेजरची हत्या करण्यास आलेल्या आरोपींना बारमध्ये गर्दी दिसल्याने, आरोपींचा प्लॅन फेल झाला. परंतु बारमध्ये त्यांनी चांगलीच तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका येथे घडली. पोलिसांनी दोन तासात आरोपीसह त्याच्या ५ अल्पवयीन साथीदारांना पकडले आहे.मानकापूर येथील २४ वर्षीय श्रेयस पाटील हा जुना जरीपटका येथील रॉयल बारमध्ये मॅनेजर आहे. त्याचा दोन-तीन वेळा परिसरातील अल्पवयीन गुन्हेगारांशी वाद झाला होता. त्यामुळे अल्पवयीन आरोपी हे श्रेयसची हत्या करण्याच्या प्रयत्नात होते. अल्पवयीन आरोपींनी खापरखेडा येथील कुख्यात बाबू मसीहा याला सूचना दिली. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता आरोपी बारमध्ये आले. त्यावेळी बारमध्ये ग्राहक होते. त्यामुळे आरोपींना शक्य झाले नाही. त्यांनी बारमध्ये शस्त्र दाखवून दहशत निर्माण केली. बारमधील ग्लास, दारूच्या बॉटलची तोडफोड केली. मॅनेजर श्रेयसला धमकी देऊन काऊंटरवरून ७ हजार रुपयांची लूट केली. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्यातून बाबू मसीहा व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस तात्काळ खापरखेडा येथे आरोपींच्या शोधात गेले. परंतू बाबू तिथे मिळाला नाही. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी येथील एका ढाब्यावर तो असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ढाब्यावरून त्याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार खुशाल तिजारे, पीएसआय नवनाथ देवकाते, एएसआय वहाब देसाई, शिपाई रोशन तिवारी, पवन यादव यांनी केली.चड्डीवर फिरविले आरोपींनाआरोपींनी शस्त्र हातात घेऊन बारमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीसुद्धा हे प्रकरण चांगलेच गंभीरतेने घेतले. पहाटे आरोपींना अटक केल्यानंतर जरीपटका ठाण्यात आरोपींना चड्डीवर फिरविण्यात आले. आरोपींच्या बाबतीत पोलिसांची ही कठोरता बघून नागरिकांनी पोलिसांची प्रशंसा केली. आरोपींची नागरिकांमधील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी हा प्रकार केला.
बार मॅनेजरच्या हत्येचा ‘प्लॅन फेल’ : आरोपी अटकेत, अर्ध नग्न धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:54 PM
बारच्या मॅनेजरची हत्या करण्यास आलेल्या आरोपींना बारमध्ये गर्दी दिसल्याने, आरोपींचा प्लॅन फेल झाला. परंतु बारमध्ये त्यांनी चांगलीच तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका येथे घडली. पोलिसांनी दोन तासात आरोपीसह त्याच्या ५ अल्पवयीन साथीदारांना पकडले आहे.
ठळक मुद्देबार तोडफोड प्रकरण