नागपूर : बार्टीच्यावतीने देण्यात येणारे आयबीपीएस, एलआयसी, रेल्वे परीक्षांचे मोफत प्रशिक्षण बंद पडले आहे. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे हजारो मागासवर्गीय विद्यार्थी गेल्या सहा महिन्यांपासून या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.
समाजकल्याण विभागाअंतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. या अंतर्गत आयबीपीएस, एलआयसी, रेल्वेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर दिले जाते. दरवर्षी प्रती केंद्रामागे ३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळते. २०१२ ते २०२३ पर्यंत ३० हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ३५ जिल्ह्यातील ४७ केंद्रांवर प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी ४ हजारावर विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवडही झाली.
या वर्षी बँकिंग व इन्शूरन्स क्षेत्रातील रिक्त जागा मोठ्या प्रमाणात भरण्यात येत आहेत. सहा महिन्यात आयबीपीएस, एलआयसीच्या जवळपास ५ ते ६ जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. जवळपास ४५ हजार रिक्त जागांसाठी परिक्षा सुद्धा घेण्यात आल्या आहेत. आता जवळपास ५० हजारच्या वर जागा निघणार आहेत. त्यापैकी सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठी एकुण २००० तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदाकरिता ४५० जागा व आयबीपीएस लिपीकाच्या ४००० जागा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत व येणाऱ्या ६ महिन्यात आणखी मोठ्या जाहिराती प्रकाशित होणार आहे. अशा परिस्थितीत जेव्हा खऱ्या अर्थाना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षणाची गरज आहे, तेव्हा बार्टाचे प्रशिक्षणच बंद पडले आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
प्रशिक्षणार्थींचे भविष्य लक्षात घेता २४ जिल्ह्यातील बंद पडलेले प्रशिक्षण सुरू करण्याकरिता निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य व चांगला निकाल देणाऱ्या संस्थांची निवड करून प्रशिक्षण तत्काळ सुरू करावे. यासंदर्भात सचिवांना निवेदनबही साादर करण्यात आले आहे.
- अशिष फुलझेले सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर