बेला : चाेरट्याने माेबाइल टाॅवरच्या २४ बॅटरी चाेरून नेल्या. या बॅटरींची किंमत ६९ हजार रुपये आहे. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणाझरी शिवारात नुकतीच घडली.
चिमणाझरी (ता. उमरेड) शिवारात माेबाइल कंपनीचे टाॅवर आहे. त्या टाॅवरला वीजपुरवठा करण्यासाठी बॅटरी व इतर उपकरणे ठेवली आहेत. तिथे सुरक्षा रक्षक तसेच अन्य कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने तिथून २४ नग बॅटरी चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच सुमेध चंद्रशेखर डाेंगरे (४०, रा. सिडकाे काॅलनी, सातगाव राेड, बुटीबाेरी) यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्या बॅटरींची एकूण किंमत ६९ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी बेला पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस नाईक अमाेल इंगळे करीत आहेत.