शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

"उद्यान मित्र व्हा! निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा", महापालिकेचे नागरिकांना आवाहन

By मंगेश व्यवहारे | Published: June 22, 2024 3:39 PM

महापालिका उद्यानांच्या विकास आणि देखभाल दुरूस्तीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘उद्यान मित्र’ हा उपक्रम राबवित आहे.

नागपूर : “उद्यान मित्र व्हा!” आणि निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. महापालिका उद्यानांच्या विकास आणि देखभाल दुरूस्तीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘उद्यान मित्र’ हा उपक्रम राबवित आहे.

शहरातील लहान मोठी उद्याने असून, या उद्यानाच्या चांगल्या प्रकारे देखभाली व संचालनाच्या कामामध्ये नागरिकांचा सहभाग राहण्याकरिता महानगरपालिकेल्या उद्यान विभागाद्वारे "उद्यान मित्र" नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांकरिता एक संकेतस्थळ देण्यात आले आहे. त्यावर नोंदणी फॉर्म उपलब्ध आहे. करिता नागरिकांनी १५ दिवसाचा आत ऑलाईन फॉर्म भरावा असे आवाहनही उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे. 

शहरात मोठी २६, मध्यम व लहान १५६ उद्याने आहेत. या उद्यानांमधील सुविधा व्यवस्थिती कार्यरत आहेत अथवा नाही याची पाहणी करून वेळेवर आवश्यक दुरूस्त्या सूचविणे व उद्यानांतील व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांमधूनच उद्यान मित्र नेमण्यात येणार आहेत.

उद्यानांची दैनंदिन साफसफाई पाहणे, हिरवळीच्या कामावर देखभाल व निगराणी ठेवणे, ग्रीन जीमची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, लहान मुलांच्या खेळण्यांची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, उद्यानाच्या विकासाची कामे सुचविणे, उद्यानातील कारंजे, स्थापत्य इतर कामांची पाहणी करणे, मनपाद्वारे बोलविण्यात येणाऱ्या मासिक बैठकीत सहभागी होणे व मनपाकडून वेळोवेळी मागविण्यात येणारे अभिप्राय नोंदविणे आदी स्वरुपाचे काम उद्यान मित्राचे राहणार आहे.

- उद्यान मित्रांकरीता निवडीचे निकष१) उद्यान मित्राचे वय २५ ते ८० वर्षापर्यंत असावे.२) एका उद्यानाकरीता एकापेक्षा अधिक उद्यान मित्रांची निवड करता येईल.३) उद्यान मित्र शक्यतोवर उद्यानाच्या (२ किमी) परिसरातील रहिवासी असावा.४) उद्यान मित्रावर गुन्हे दाखल नसावेत (मनपा नागपूर कडून पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येईल.)५) सामाजिक कार्य किंवा उद्यान शास्त्राचा अनुभव असलेल्यास प्राधान्य देण्यात येईल.६) उद्यान मित्राचे कार्यक्षेत्र हे उद्यान देखरेख, स्वच्छता पर्यावरणाशी संबंधीत क्षेत्रात जनजागृती, वृक्ष लागवड, जतन आदी संबधीत महानगरपालिकेला अभिप्राय, सुचना देणे क्षेत्रांशी मर्यादीत राहील.७) उद्यान मित्राला ओळखपत्र देण्यात येईल व त्याची वैधता कमाल तीन वर्षापर्यंत राहील.

टॅग्स :nagpurनागपूर