निशांत वानखेडे, नागपूर : राज्यात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा व बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणात १ ते २ अंशांनी वाढू शकते, असा इशारा सेंटर फॉर सायन्स, टेक्नालॅजी ॲण्ड पाॅलिसी या संस्थेने दिला आहे. हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही, तर ३ अंशांनी वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फाॅर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे. २०३० पर्यंत हाेणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाची आकडेवारी व काॅर्डेक्स (काेऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) माॅडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकॉर्ड तोडत आहेत. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. - प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.
सर्वांत कमी तापमानाचे जिल्हे
गडचिरोली, कोल्हापूर, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.
भंडारा २.० अकोला १.३ अमरावती १.६नागपूर १.१छ. संभाजीनगर १.१बीड १.२गोंदिया १.१बुलढाणा १.४धुळे १.१हिंगोली १.२जळगाव १.३लातूर १.४नंदुरबार १.६धाराशिव १.४वर्धा १.१वाशीम १.२यवतमाळ १.१चंद्रपूर ०.८