योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ने जारी केलेली आकडेवारी भविष्यातील धोक्यांचे संकेत देणारी आहे. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार देशातील प्रदूषित शहरांमध्ये नागपूरचा क्रमांक १६ व्या स्थानी आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीत शहरात ‘पीएम २.५’चे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.वायूप्रदूषणासंदर्भात ‘पीएम २.५’ हे ‘पीएम १०’पेक्षा जास्त घातक मानण्यात येतात. नागपुरातील ‘पीएम २.५’चे प्रमाण २०१३ साली ३३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर गेले. तर २०१६ हाच आकडा चक्क ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचला. ‘पीएम २.५’च्या प्रमाणानुसार नागपुरचा देशातील प्रदूषित शहरांमध्ये १६ वा क्रमांक लागतो. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी १० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे तर भारतात ही पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी आहे. या पातळीहून नागपुरात हे प्रमाण फार जास्त आहे.‘पीएम १०’चे प्रमाणदेखील वाढीसत्याचप्रमाणे ‘पीएम १०’च्या प्रमाणानुसार नागपुरचा क्रमांक देशात २५ वा आहे. २०१३ साली ६१ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर, २०१४ मध्ये ६३ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर तर २०१६ मध्ये हेच प्रमाण ८६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरवर पोहोचले. ‘पीएम १०’चे प्रमाणदेखील वाढीस लागल्याचे चित्र आहे.काय आहेत ‘पीएम’हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिश्रण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम २.५’ (पर्टिक्युलेट मॅटर २.५ मायक्रॉन), ‘पीएम १०’ (पर्टिक्युलेट मॅटर १० मायक्रॉन) तसेच ‘एमएसपीएम’ (सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर) अशा ३ श्रेणींमध्ये विभाजित करण्यात येते. ‘पीएम २.५’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार २.५ मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो.