लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या हॉटेलपासून ते गल्लीबोळ्यातील हॉटेलपर्यंतचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवितात. आरोग्याला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ट दर्जाचा मावा वापरला जातो. विशेष म्हणजे हा मावा शेजारील छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत आहे. ही भेसळ सहजासहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट््सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो. नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या खाद्य तेलाचा मोठ्या साठ्यावर धाड टाकून कारवाई केली. गेल्या काही दिवसात खाद्यतेल, मावा, बेसन व इतरही पदार्थांचे या विभागाने ५५ नमुने ताब्यात घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल येताच त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहण्याचे आवाहनही ‘एफडीए’ने केले आहे.
सावधान! दिवाळीच्या मिठाईत होऊ शकते भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:25 AM
दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या हॉटेलपासून ते गल्लीबोळ्यातील हॉटेलपर्यंतचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देएफडीएने घेतले खाद्यपदार्थांचे ५५ नमुने