लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मिडियावर वर अपलोड करीत असाल, तर सावधान! तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात आग लावू शकतात. होय, अशा अनेक घटना देशभरात यापूर्वी घडल्या असून आता या ट्रेंडला बळी पडणाऱ्यांचे धोके वाढले आहेत.असा आहे ट्रेंडगेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली स्वत:चे व आपल्या परिवाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याला बळी पडून अनेक जण पत्नीसोबतचे फोटो अपलोड करीत आहेत. कुणी नववारीत तर कुणी सूटमध्ये कुणी पारंपरिक तर कुणी पाश्चात्य परिधान करून हे चॅलेंज स्वीकारण्याच्या नादात अनेक जण धोक्याला परवानगी देत आहेत.असा होईल धोकाकपल चॅलेंज नावाने सर्च केले असता हजारो दाम्पत्यांचे फोटो त्यांना सहज उपलब्ध होत आहेत. कारण त्याला तो हॅशटॅग दिला गेला आहे.विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसºया महिलेचे मार्फ (एडिट) करून ते अश्लील छायाचित्र नातेवाईकांना किंवा मित्रपरिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते.पोलिसांकडे तक्रार कराअशा प्रकारचे अनेक गैरप्रकार यापूर्वी ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा कोणत्याही चॅलेंजच्या नादात आपले अथवा पत्नीचे, मुलींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. ज्यांनी फोटो अपलोड केले आणि कुणाला सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी लगेच नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.खाकीची धडकसोशल मिडियावर सुरू झालेल्या या ट्रेंडवर खाकीनेही उडी घेतली आहे. अनेक पोलिसांनी समूहा(ग्रुप)ने आपले खाकीतील फोटो शेअर केले आहेत. खाकीचे हे कडक फोटो कमालीचे भाव खाऊन जात आहेत.
सावधान..! ‘चॅलेंज’च्या ट्रेंडला बळी कशाला पडता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 9:07 PM
कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मिडियावर वर अपलोड करीत असाल, तर सावधान! तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात आग लावू शकतात. होय, अशा अनेक घटना देशभरात यापूर्वी घडल्या असून आता या ट्रेंडला बळी पडणाऱ्यांचे धोके वाढले आहेत.
ठळक मुद्देकुटुंब उद्ध्वस्त करू नका : अनेकांना धोका, सायबर गुन्हेगारांना मिळतेय संधी