निवडणुकीसाठी सज्ज राहा: विकास ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:03 AM2018-06-12T01:03:08+5:302018-06-12T01:03:36+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.
शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, मनपा पराभूत उमेदवार, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक देवडिया काँग्रेस भवनात विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, अॅड.अभिजित वंजारी, काँग्रेसचे प्रवक्ते विशाल मुत्तेमवार, मनपातील माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, प्रशांत धवड, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे,रमण पैगवार,विवेक निकोसे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक आदी उपस्थित होते.
बूथ अध्यक्ष हाअभ्यासू, निर्णयक्षमता असणारा असावा. मतदारांना परिचित असावा. ब्लॉक अध्यक्षांनी बूथ अध्यक्षाची निवड करताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. बूथ अध्यक्षांसह ११ जणांची कार्यकारिणीची यादी येत्या २० जूनपर्यंत द्यावी. असे निर्देश विकास ठाक रे यांनी ब्लॉक अध्यक्षांना दिले. ब्लॉक अध्यक्षाला सहा प्रमुखाची समन्वयक समितीदेखील बनवून देण्यात आली. यादी तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीला पाठविली जाणार आहे. बूथ प्रमुखांचा मेळावा जुलै महिन्याच्या प्रारंभी घेतला जाईल. यापुढेताकदीने आंदोलन करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
बैठकीला ब्लॉक अध्यक्ष पंकज निघोट, वैभव काळे, प्रभाकर खापरे, निर्मला बोरकर,अनिल पांडे, प्रकाश बांते, महेश श्रीवास, प्रभाकर खापरे, इर्शाद मलीक, सूरज आवळे,विवेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, राजकुमार कमनानी, राजेश नंदनकर ,नगरसेवक रमेश पुणेकर,रश्मी धुर्वे,नितीन साठवणे,माजी नगरसेवक वासुदेव ढोके,फिरोज खान,प्रशांत कापसे, अशोक यावले, नरेश शिरमवार,प्रकाश ठाकरे,अर्चना बडोले,इर्शाद अली,प्रसन्ना जिचकार,स्नेहल दहीकर, मिलिंद सोनटक्के,कल्पना जोगे,जॉन थॉमस, विनोद नागदेवते, रवी गाडगे पाटील,राजेश कुंभलकर,अब्दुल शकील, धरम पाटील,अलोक मुन,रमेश मौदेकर,प्रीती साहारे,राजाभाऊ चिलाटे,सुनिता ढोले, किशोर गजभिये,आशीष नाईक,विनायक इंगोले,बॉबी दहीवाले,अजय नासरे,किशोर गीद,सुनील दहीकर,दिपक घाटोळे,अरविंद वानखेडे,रमेश चौकीकर,नरेश खडसे,पुरुषोत्तम पारमोरे, ज्ञानेश्वर ठाकरे,पंकज लोणारे, इर्शाद शेख, इमरान पठाण,संजय पेदाम,आशिफ शेख,अनिल सहारे, शंकर बनारसेसहित पदाधिकारी,नगरसेवक,पराभूत उमेदवार उपस्थित होते.