लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणबी समाजावर सातत्याने अन्याय सुरू आहे़ आरक्षणाची अंमलबजावणी करताना ओबीसीतील इतर सर्व जातींसाठी नाँनक्रिमिलेअरची अट रद्द करून केवळ कुणबी समाजासाठी नॉनक्रिमिलेअर लागू असावे, अशी अन्यायकारक शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे़ अशाप्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासह समाजाच्या उद्धारासाठी एकजूट होणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत कुणबी स्वराज महासंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.झिंगाबाई टाकळी येथील दत्त सभागृहात कुणबी स्वराज महासंघ, नागपूरच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विष्णू घोलम होते. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, परिणय फुके, माजी आमदार अशोक धवड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, तुषार घोलम, कुणबी स्वराज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खोरगडे, दत्तात्रेय ठाकरे, तिरळे कुणबी सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे, नरेश बरडे, नगरसेविका संगीता गिºहे, साधना बरडे, रूपराव शिंगणे, आरटीओ शरद जिचकार, बंडू ठाकरे, जगदीश कोहळे आदी उपस्थित होते़छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले़ या वेळी घोलम म्हणाले, केवळ कुणबी जातीसाठी नॉनक्रिमिलेअर लागू ठेवणे म्हणजेच संख्येने सर्वात जास्त असलेल्या कुणबी समाजाला ओबीसीतून वगळण्याचा डाव आहे़ ओबीसी एकत्र येत असल्याचे बघून राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे़ त्यामुळेच अशाप्रकारचे षङ्यंत्र करून ओबीसींची ताकद कमी करण्याचे तसेच आपसात भांडणे लावण्याचे कारस्थान केले जात आहे़ काहीही झाले तरी ओबीसींना एकत्र येऊ द्यायचे नाही, या उद्देशाने सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी मान्यवरांनी कुणबी समाज भवन नसल्याची खंत व्यक्त केली. संचालन अॅड. स्नेहल ठाकरे यांनी केले़. कार्यक्रमाला अंबादास कोहळे, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश राऊत, नितीन कोहळे, अविनाश ठाकरे, राजेंद्र खोरगडे, गिरीश खोरगडे, रत्नाकर कडू, केतन शिंदे, नीरज केंडे आदी उपस्थित होते.-तर विधानभवनावर धडक देऊकुणबी समाजावर होणारा अन्याय यानंतर सहन केला जाणार नाही़ केवळ मतांसाठी कुणबीबांधवांचा वापर करणार असाल तर सत्ताधाºयांनाही आम्ही धडा शिकवू़ ओबीसीतील इतर जातींप्रमाणे कुणबी जातीसाठीही नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करावी़ अन्यथा हजारो समाजबांधवांसह आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडक देऊन सत्ताधाºयांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ़ दिलीप खोरगडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांनी दिला़
कुणबी समाजाच्या उद्धारासाठी एकजूट व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:25 AM
कुणबी समाजावर सातत्याने अन्याय सुरू आहे़ आरक्षणाची अंमलबजावणी करताना ओबीसीतील इतर सर्व जातींसाठी नाँनक्रिमिलेअरची अट रद्द करून केवळ कुणबी समाजासाठी नॉनक्रिमिलेअर लागू असावे, ....
ठळक मुद्देकुणबी स्वराज महासंघ : ‘नॉनक्रिमिलेअर’चा प्रश्न सोडवा