रामटेक : गाडी हळू चालविण्यास सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून आराेपींनी एकाला मारहाण करीत जखमी केले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर येथे गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
हरिचंद जगन मरस्काेल्हे (४५, रा. मनसर, ता. रामटेक) असे जखमीचे नाव असून, आराेपींमध्ये राहुल कठाेते, पवन कठाेते, रा. कांद्री माईन व इतर ५ ते ७ जणांचा समावेश आहे. आराेपी राहुल कठाेते हा आपली माेपेड गाडी राेडने जाेराने चालवित असताना, हरिचंद मरस्काेल्हे यांनी त्यास ‘बापू गाडी हळू चालव’ असे म्हटले असता, आराेपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मरस्काेल्हे आपल्या घरी निघून गेले. दरम्यान, आराेपी राहुल कठाेते, पवन कठाेते व इतर ५ ते ७ जणांनी मरस्काेल्हे यांना गाठले. पवन कठाेते याने चावीच्या गुच्छाने त्यांच्या कपाळावर मारून जखमी केले. शिवाय इतर आराेपींनी शिवीगाळ व हाताबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मरस्काेल्हे यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४६, १४७, १४९, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी बाेरकर करीत आहेत.