शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

तिकिटे नसल्याने क्रिकेट शौकिनांची फसगत

By admin | Published: March 11, 2016 3:21 AM

क्रिकेट सामन्याचा आनंद लुुटण्यासाठी कुटुंबीय जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या परिसरात दाखल होतात.

सामना जामठ्यात : आॅन लाईन तिकीट विक्री व्हीसीएच्या जुन्या स्टेडियममध्ये !नागपूर : क्रिकेट सामन्याचा आनंद लुुटण्यासाठी कुटुंबीय जामठा येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या परिसरात दाखल होतात. सामन्याबाबतची सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. पण तिकिटे उपलब्ध नसल्याचे कळताच त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. गुरुवारी हे चित्र स्कॉटलंड- झिम्बाब्वे ‘ब’ गट पात्रता सामन्याच्यावेळी व्हीसीए परिसरात पहायला मिळाले. अनेकक्रिकेट चाहते आल्यापावली परत गेले.सामना जामठ्यात आणि तिकीट विक्री सिव्हील लाईन्स येथील जुन्या व्हीसीए स्टेडियममध्ये असल्याने अनेकांना शहरात परत यावे लागले. १०० आणि २०० रुपयांपासून किंमत असलेली तिकिटे मिळविण्यासाठी दोन तासांचा प्रवास अर्थात सामन्यास मुकण्यासारखेच आहे. २००८ साली जामठ्यात उभारण्यात आलेल्या नव्या स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ४५ हजार इतकी आहे. शहराच्या मधून २० किमीचा प्रवास करण्यासाठी किमान ४० मिनिटे लागतात. आॅटोरिक्षाने त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तिकीटविक्री जुन्याच स्टेडियममध्ये असल्याने घोळ उत्पन्न झाला. व्हीसीए अधिकाऱ्यांच्या मते दोन्ही स्टेडियमवर तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध ठेवणे शक्य नाही. देशात तिकीट विक्रीवर बीसीसीआयचे नियंत्रण आहे पण सामनास्थळी तिकीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यजमान संघटनेची असल्याने यावर भाष्य करणे बीसीसीआयने टाळले. नागपूरप्रमाणे धरमशाला येथे ‘अ’ गटाचे पात्रता सामने खेळविले जात आहे. तेथे मात्र स्टेडियमच्या गेटवरच तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागपुरात तिकिटे कुठे मिळतील याची माहिती आम्ही स्थानिक वृत्तपत्रांद्वारे दिली असल्याचा दावा व्हीसीएने केला. पण त्यांचा हा दावा फोल असल्याचे मत अनेक क्रिकेट शौकिनांनी व्यक्त केले.स्टेडियमच्या आत तसा शुकशुकाट आहे. पहिल्या सामन्याच्यावेळी तर बोटावर मोजण्याइतकेच लोक होते. गुरुवारी काही शाळकरी मुलांनी हजेरी लावल्याने परिस्थिती किंचित सुधारली.त्याआधी झिम्बाब्वेचा डाव सुरू झाला तेव्हा शंभरच्यावर लोक नव्हते. शहराबाहेर असलेल्या स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याऐवजी क्रिकेटशौकिन पब किंवा कॅफेत जाऊन सामना पाहण्यास पसंती दर्शवित आहेत. जे स्टेडियमपर्यंत आले त्यांना तिकीट मिळाले नाही. यामुळे नर्व्हस झालेला एक चाहता म्हणाला,‘ आम्ही क्रिकेटवर प्रेम करीत असल्याने उन्हाचे चटके सोसून २० किलोमीटरवरून आलो. आॅन लाईन तिकीट खरेदी नेटवर्कमुळे यशस्वी होऊ शकली नाही. येथे आलो तर कळले की तिकिटे जुन्या व्हीसीएवर मिळू शकतील. पण गेटवर पैसे मोजून तिकिटे का मिळू शकत नाहीत, असा सवाल कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी केला. सामन्याला आधीच तुरळक उपस्थिती असते तरीही तिकीट विक्रीची सोय सामनास्थळी का नाही. जामठा स्टेडियमबाहेर हाच चर्चेचा विषय आहे. (क्रीडा प्रतिनिधी)जामठ्यात सजले हेल्मेटचे स्टॉल्स!टी-२० विश्वचषकाचे क्रिकेट सामने पहायला येणाऱ्या शौकिनांना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमबाहेर खिसे मोकळे करावे लागत आहेत. हेल्मेट घेऊन येणाऱ्यांना स्टॉलवर हेल्मेट ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत. पोलिसांनी सामना पहायला येणाऱ्या प्रेक्षकांना कुठलीही वस्तू सोबत घेऊन जाण्यास मनाई केली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू आणि बॅग देखील सोबत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात येत असून दुचाकीस्वारांना हेल्मेटही वाऱ्यावर सोडून द्यावे लागते. हायवेवर हेल्मेट बंधनकारक असल्याने अनेक दुचाकीस्वार हेल्मेटसह येथे येतात पण सोबत घेऊन जाण्यास बंदी आहे. या संधीचा लाभ घेत जामठा गावातील अनेक तरुणांनी हेल्मेट स्टॉल्स उभारले आहेत. पाच ते सहा स्टॉल्स गुरुवारी सजले होते. या स्टॉलवर हेल्मेट ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये आकारले जातात. ज्या दुचाकीस्वारांच्या वाहनांना हेल्मेट लॉक करण्याची सोय नाही, अशांनी पैसे देऊन स्टॉल्सवर हेल्मेट जमा केले. एका हेल्मेट स्टॉलवाल्याकडे ५० च्यावर हेल्मेट दिसले. त्याला विचारताच साडेतीन तास हेल्मेटची राखण करण्याचे हे शुल्क आकारत असल्याचे सांगितले. पण हेल्मेट गहाळ झाल्यास जबाबदारी आपली नसल्याचेही स्टॉलवाल्याने स्पष्ट केले.